• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. india pins hopes on four vaccines to inoculate thirty crore by july dmp

जानेवारीत भारतात कसे असेल लसीचे स्टेटस? ३० कोटी लोकसंख्येला कधीपर्यंत मिळणार डोस?

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून सर्वसामान्यांची जीवन जगण्याची पद्धत बदलून गेली आहे. संपूर्ण जग या व्हायरसमुळे त्रस्त आहे. लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
    1/10

    करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून सर्वसामान्यांची जीवन जगण्याची पद्धत बदलून गेली आहे. संपूर्ण जग या व्हायरसमुळे त्रस्त आहे. लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

  • 2/10

    लाखो लोक या आजारामुळे बेरोजगार झाले आहेत. अजूनही या व्हायरसचा धोका टळलेला नाही. सर्वांचेच लक्ष लसीकडे आहे. करोना व्हायरसवर मात करण्यासाठी आवश्यक असलेली लस आता दृष्टीपथात आली आहे.

  • 3/10

    जानेवारी महिन्यात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन या दोन लसी तर एप्रिलपर्यंत चार लसी उपलब्ध होतील अशी सरकारला अपेक्षा आहे.

  • 4/10

    जुलै पर्यंत ३० कोटी जनतेला करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्याची योजना आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे.

  • 5/10

    भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीला जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते.

  • 6/10

    आपातकालीन मान्यतेसाठी फायझरने अर्ज केला आहे. या अर्जावर औषध नियंत्रक आणि सरकार विचार करत आहे. त्यांना मान्यता मिळू शकते पण भारताच्या लसीकरण कार्यक्रमासाठी किती डोस फायझरकडून उपलब्ध होऊ शकतात, ते महत्त्वाचे आहे. (Photo: Reuters)

  • 7/10

    फायझरची लस स्टोअर करणे एक मोठे आव्हान आहे. तशा प्रकारचे तापमान मेन्टेन करण्यासाठी आवश्यक सुविधा नाहीयत.

  • 8/10

    या तीन लसींशिवाय रशियाची स्पुटनिक व्ही लसही एप्रिलपासून उपलब्ध होऊ शकते. एप्रिलपर्यंत भारतामध्ये चार लसी उपलब्ध होऊ शकतात. प्राधान्य गट जून-जुलैपर्यंत कव्हर होऊ शकतो असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

  • 9/10

    यूके, बहरीन आणि अन्य देशात फायझरच्या लसीला आपातकालीन वापराची मान्यता मिळाली आहे. भारतातही त्यांनी अर्ज केला आहे. ही करोना प्रतिबंधक लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

  • 10/10

    स्वदेशी कोव्हॅक्सीन लसीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत तर डॉ. रेड्डी लॅबने रशियन लस स्पुटनिक व्ही चाचण्या सुरु केल्या आहेत.

Web Title: India pins hopes on four vaccines to inoculate thirty crore by july dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.