Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. wild bull create ruckus died during rescue operation in kothrud pune sgy

आश्चर्य, धावपळ, दमछाक आणि मृत्यू…पुण्यातील रानगव्याच्या मृत्यूने हळहळ, जबाबदार कोण?

गव्याला पाहण्यासाठी पुणेकरांनीही गर्दी केली होती

Updated: September 9, 2021 00:44 IST
Follow Us
  • पुण्यामधील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कारण सोसायटीच्या आवारात चक्क गवा फिरत होता. (Express Photo: Ashish Kale)
    1/11

    पुण्यामधील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कारण सोसायटीच्या आवारात चक्क गवा फिरत होता. (Express Photo: Ashish Kale)

  • 2/11

    सोसायटीत गवा शिरल्याचा माहिती मिळताच एकच गोंधळ उडाला होता. प्रामुख्याने जंगलांमध्ये आढळून येणारा हा प्राणी लोकवस्तीमध्ये दिसून आल्याने गोंधळ उडाला.

  • 3/11

    गव्याला पाहण्यासाठी पुणेकरांनीही चांगलीच गर्दी केली होती.

  • 4/11

    मानवी वस्तीत आलेल्या या जंगली प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्यात आला. सकाळी साडेअकराच्या सुमारास वन अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत गवा उजवी भुसारी कॉलनीमधील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरला.

  • 5/11

    लोकवस्तीमध्ये शिरल्याने काही ठिकाणी धडक दिल्याने गव्याच्या तोंडाला काही प्रमाणात दुखापत झाली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची या गव्याला पकडताना चांगलीच दमछाक झाली.

  • 6/11

    वन अधिकारी या गव्याचा पाठलाग करत असतानाच तो पौड रोड वरील मुख्य रस्त्यावर पोहचला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोरीच्या मदतीने पकडण्याचे प्रयत्न सुरू केले.

  • 7/11

    दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले आहे. तरी देखील वन कर्मचाऱ्याच्या अधिकार्‍यांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हतं.

  • 8/11

    गवा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हता. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वन अधिकाऱ्यांना यश आलं.

  • 9/11

    पण अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 10/11

    “कोथरूड भागात आज सकाळच्या सुमारास रानगवा नागरिकांना दिसून आल्यानंतर आम्हाला याबाबत माहिती देण्यात आली. आम्ही काही वेळात घटनास्थळी पोहचलो. त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे रानगवा बिथरला. डार्ट मारल्यानंतर त्याची धावाधाव झाल्यामुळे घाबरून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे,” अशी माहिती वन अधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.

  • 11/11

    शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकणार आहे असंही ते म्हणाले आहेत.

Web Title: Wild bull create ruckus died during rescue operation in kothrud pune sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.