• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mackenzie scott former wife of jeff bezos donates over 4 billion dollars in four months scsg

३० हजार ६६० कोटींचे दान… चार महिन्यात ‘तिने’ ३८४ संस्थांना केली मदत

गरीब, बेघरांसाठी श्रीमंतांनी पुढे येण्याचं केलं आवाहन

Updated: September 9, 2021 00:42 IST
Follow Us
  • जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अ‍ॅमेझॉनचे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझॉस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर पोटगी म्हणून मिळालेल्या संपत्तीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या जेफ यांच्या पत्नी मॅकेन्झी स्कॉट पुन्हा चर्चेत आहेत. जगातील सगळ्यात खर्चीक घटस्फोटानंतर सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत  मॅकेन्झी यांनी सर्वाधिक पैसा दान म्हणून देण्याचाही नवा विक्रम केला आहे.
    1/15

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अ‍ॅमेझॉनचे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझॉस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर पोटगी म्हणून मिळालेल्या संपत्तीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या जेफ यांच्या पत्नी मॅकेन्झी स्कॉट पुन्हा चर्चेत आहेत. जगातील सगळ्यात खर्चीक घटस्फोटानंतर सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत  मॅकेन्झी यांनी सर्वाधिक पैसा दान म्हणून देण्याचाही नवा विक्रम केला आहे.

  • 2/15

    मॅकेन्झी स्कॉट यांनी मागील चार महिन्यांमध्ये ४२० कोटी डॉलर (अंदाजे ३० हजार ६६० कोटी रुपये) ३८४ संस्थांना दान म्हणून दिले आहेत. अमेरिकेमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून महिला, दारिद्रय रेषेखालील गरीबांसाठी काम करणाऱ्यांना संस्थांना मॅकेन्झी यांनी हा पैसा दान केला आहे.

  • 3/15

    मॅकेन्झी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये करोनाचा अमेरिकेतील नागरिकांवर कशाप्रकारे परिणाम झाला आहे यासंदर्भात भाष्य केलं आहे. अमेरिकेतील खास करुन महिला आणि दारिद्रय रेषेखालील गरीबांना मोठा फटका बसला आहे. अशा लोकांना खूप संकटांना तोंड द्यावं लागत आहे, असं मॅकेन्झी सांगतात.

  • 4/15

    एकीकडे गरीब आणि गरजू व्यक्तींना या करोना संकटाची झळ बसत असतानाचा दुसरीकडे श्रीमंताची संपत्ती झपाट्याने वाढत आहे. अशावेळी श्रीमंत व्यक्तींनी आपली जबाबदारी ओळखून सामाजातील अशा घटकांना मदत करण्यासाठी पुढे येणं गरजेचे असल्याचं मत मॅकेन्झी यांनी व्यक्त केलं आहे.

  • 5/15

    मॅकेन्झी यांनी अमेरिकेमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून आतापर्यंत सहा अरब डॉलर्सची मदत केली आहे. आर्थिक दृष्ट्या दूर्बल असणाऱ्यांना मदत करणाऱ्या संघटनांना सर्वांनीच पाठिंबा देणं सध्याच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे असं मॅकेन्झी यांनी म्हटलं आहे. 

  • 6/15

    मॅकेन्झी यांनी जुलै महिन्यामध्ये ना नफा ना तोटा तत्वावर काम करणाऱ्या ११६ संस्था, विद्यापिठं, सामाजिक गट आणि कायदेशीर काम करणाऱ्या संस्थांना १.६८ अरब डॉलर इतकी रक्कम दान म्हणून दिली आहे.

  • 7/15

    त्याचप्रमाणे मॅकेन्झी यांनी करोनामुळे आर्थिक फटका बसल्याने उद्धवस्त झालेल्या लोकांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी आपल्या आर्थिक सल्लागारांना जास्तीत जास्त पैसा गरज असणाऱ्या संस्थांपर्यंत कसा पोहचवता येईल यासाठी काम करण्यास सांगितलं आहे.  

  • 8/15

    सामान्यपणे एवढ्या मोठ्याप्रमाणामध्ये पैसा दान देताना श्रीमंत लोकं त्यांनीच सुरु केलेल्या संस्थाना ंमदत करतात. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग आणि इतर अनेक श्रीमंत लोक अशाप्रकारे त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थांना दान देत सामाजिक भान जपतात. मात्र मॅकेन्झी यांनी केलेली मदत या सर्वांपेक्षा खास आहे असं म्हणता येईल.

  • 9/15

    तळागाळातील व्यक्तींसाठी काम करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या संस्थांना मदत करण्याचा निर्णय मॅकेन्झी यांनी घेतला आहे. खाण्या-पिण्यासंदर्भातील अडचणींना तोंड देणाऱ्या, वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या, दारिद्रय रेषेखालील गरीबांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्यासाठी भरपूर माहिती गोळा केली आहे. मॅकेन्झी यांनी यासाठी एक टीम तयार केली असून त्याच्या मदतीने त्यांनी आर्थिक मदत करण्यास सुरुवात केलीय.

  • 10/15

    ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार मॅकेन्झी स्कॉट या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये १८ व्या स्थानी आहेत. यावर्षी मॅकेन्झी यांची सपत्ती २३.६ अरब डॉलर्सवरुन वाढून ६०.७ अरब डॉलर्सपर्यंत गेली. 

  • 11/15

    अ‍ॅमेझॉन इंकच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने मॅकेन्झी यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली. यावर्षी मॅकेन्झी यांनी आतापर्यंत सहा अरब डॉलर्स दान केले आहेत. खास करुन करोना काळामध्ये त्यांनी मोठ्याप्रमाणात पैसा दान केलाय.

  • 12/15

     ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, जेफ बेझॉस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर पोटगी म्हणून मॅकेन्झी बेझोस यांना ३८.३ अब्ज डॉलर (सुमारे २५ लाख कोटी रुपये) देण्यात आले होते. २५ वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

  • 13/15

    रॉकफेलर फिलॉन्थ्रॉपी अ‍ॅडव्हाइझर्सच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षा मेलिसा बर्मन यांनी मॅकेन्झी यांनी दिलेलं दान हे सर्वाधिक दान असल्याचं म्हटलं आहे. स्मृतीप्रत्यर्थ दान वगळता कोणत्याही व्यक्तीने दान म्हणून आतापर्यंत दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे, असं बर्मन यांनी स्पष्ट केलं आहे. ही रक्कम गरीबांबरोबरच बेघरांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या कामांसाठी वापरली जाणार आहे.

  • 14/15

    मॅकेन्झी या सध्या करोनामुळे फटका बसलेल्या घटकांसाठी पैसा दान करत आहेत. मात्र त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये पाणी आणि वायू परिवर्तनासाठी काम करणाऱ्या संस्थेला दहा अरब डॉलर रुपये दान केले होते. मागील महिन्यामध्ये त्यांनी १६ वेगवेगळ्या गटांना ८० कोटी डॉलर दान देण्याची घोषणा केली होती. 

  • 15/15

    बेघर लोकांसाठी मॅकेन्झी यांनी दुसऱ्यांदा मोहीम हाती घेत ४२ संस्थांना १० कोटी डॉलर दान म्हणून दिले. (फोटो सौजन्य : रॉयटर्स, एपी आणि सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

Web Title: Mackenzie scott former wife of jeff bezos donates over 4 billion dollars in four months scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.