-
आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्राचाराचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा या सोमवारपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. (सर्व फोटो: एएनआय आणि twitter/INCIndia तसेच twitter/priyankagandhi वरुन साभार)
-
आपल्या या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी प्रियंका गांधींनी सधारु टी स्टेट या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांशी चर्चाही केली.
-
त्यानंतर प्रियंका यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली.
-
दर निवडणुकीला आसाममधील चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर हे निवडणुकीमधील मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात.
-
अगदी पारंपारिक वेशामध्ये प्रियंका यांनी चहाच्या पानांची तोडणी केली.
-
प्रियंका यांनी चहाची पानं कशी तोडता इथपासून ते प्रत्यक्षात चहाच्या मळ्यात जाऊन ती तोडण्याचा अनुभवही घेतला.
-
प्रियंका यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारी प्रियंका यांनी कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये पूजा करुन दौऱ्याला सुरुवात केली होती.
-
प्रियंका यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कामाख्या मंदिरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
-
आसाममध्ये १२६ सदस्यांची विधानसभा असून येथे २७ मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीय नेत्यांचे आसाम दौरे सुरु झाले असून प्रियंका यांचा दौराही अशाच प्रचारदौऱ्यांपैकी आहे.
-
सोमवारी प्रियंका या सर्वात आधी जलुकबारी परिसरामध्ये थांबल्या. येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं.
-
त्यानंतर प्रियंका नीलाचल हिल्स येथील शक्तिपीठाकडे रवाना झाल्या. यावेळी प्रियंका यांनी, “मागील बऱ्याच काळापासून मला या मंदिराला भेट द्यायची होती, आज अखेर ती इच्छा पूर्ण झाली. मी स्वत:च्या कुटुंबाबरोबरच आसामी लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना केली,” असं म्हटलं होतं.
प्रियंका गांधींचा हटके प्रचार : कामाख्या मंदिर भेटीपासून ते चहाच्या मळ्यांमध्ये पान तोडण्यापर्यंत
प्रियंका गांधींचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतायत
Web Title: Priyanka gandhi vadra 2 day assam visit photos kamakhya temple to plucks tea leaves scsg