-
गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस झपाट्याने वाढत आहे. वडोदऱ्यामधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येथील मशिदीमधील व्यवस्थापनानेच सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. (सर्व फोटो एएनआयवरुन साभार)
-
जहांगीरपूर येथील एका मशीदमध्येच मशीद व्यवस्थापनाच्या पुढाकाराने ५० खाटांचे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे.
-
"ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता असल्याने आम्ही मशिदीमध्ये कोव्हिडी सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. रमजानच्या महिन्यात यापेक्षा अधिक पवित्र कोणतं काम करता येईल," अशा शब्दांमध्ये या मशिदीच्या ट्रस्टींनी आपल्या भावना एएनआयशी बोलताना व्यक्त केल्या.
-
या सेंटरमध्ये रुग्णांना ऑक्सिजनपासून जेवणापर्यंतच्या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत.
-
करोना रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी रुग्णवाहिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे गुजरातमधील फोटो काही दिवसांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. यासंदर्भात राज्य सरकारने खुलासा करताना सरकारी रुग्णालयांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच करोना रुग्णला दाखल करुन घेताना काही नियमांचे पालन करावे लागते त्यामुळे उशीर होत असावा असंही सरकारकडून सांगण्यात आलं.
Photos : गुजरातमध्ये मशिदीतच उभारलं ५० बेड्सचं कोव्हिड सेंटर
राज्यामधील रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता असल्याने मशीद व्यवस्थापनाने घेतला पुढाकार
Web Title: Mosque in vadodara turned into 50 bed covid facility amid shortage of hospital beds scsg