• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ramdev baba who called allopathy a stupid science had also resorted to allopathy srk

‘मूर्ख विज्ञान’ म्हणणाऱ्या रामदेवबाबांनी देखील घेतला होता ‘अ‍ॅलोपॅथीचा’ आश्रय

“अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” असे विधान पतंजलीचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेवबाबा यांनी केले होते

May 24, 2021 16:18 IST
Follow Us
  • “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” असे विधान पतंजलीचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेवबाबा यांनी केले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. रामदेवबाबा यांच्या वक्तव्याविरोधात 'आयएमए'नं आक्रमक पवित्रा घेतला. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. (Express Archive Photo)
    1/6

    “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” असे विधान पतंजलीचे सर्वेसर्वा योगगुरु रामदेवबाबा यांनी केले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. रामदेवबाबा यांच्या वक्तव्याविरोधात 'आयएमए'नं आक्रमक पवित्रा घेतला. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. (Express Archive Photo)

  • 2/6

    या प्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी योगगुरु रामदेवबाबा यांना पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर रामदेवबाबांनी माफीनामा सादर केला. जरी माफी मागून हे प्रकरण शांत झाले असले तरी यापुर्वी रामदेवबाबा आणि त्यांचे सहयोगी आचार्य बालकृष्ण यांनी अ‍ॅलोपॅथीचा आश्रय घेतला होता. (Express Archive Photo)

  • 3/6

    जेव्हा संपुर्ण भारतात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला गेला होता. अण्णा हजारे यांनी या चळवळीचे नेतृत्व केले होते. रामदेबाबा देखील त्या आंदोलनाचा हिस्सा होते. दिल्लीच्या रामलीला मैदानावर ते उपोषणाला बसले होते. ४ जून २०११ च्या संध्याकाळी तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल सिाब्बल यांनी असा दावा केला होता की, उपोषण संपवण्याच्या संबंधित रामदेवबाबा यांचे पत्र आपल्याला मिळाले. मात्र, रामदेवबाबा यांनी तो त्यांचा दावा खोटा ठरविला. त्यावेळी रात्री थकलेल्या अवस्थेत रामदेवबाबा झोपले होते. त्यानंतर तेथे पोलीस पोहचले आणि गोंधळ उडाला. यावेळी अश्रुधुरांचा मारा देखील करण्यात येत होता. रामदेवबाबा स्टेजवर आले आणि खाली उडी मारली. (Express Archive Photo)

  • 4/6

     दरम्यान, त्यांना पोलिसांनी पकडले आणि देहरादूनला पाठवले. मात्र मात्र, तिथेही ते उपोषण करत होते. त्यांच्या जिद्दीमुळे त्यांची तब्येत ढासळली. त्यांना देहरादूनच्या जॉलीग्रींट रुग्णालयात हलविण्यात आले. रामदेवबाबा यांना यावेळी बीपीची समस्या होती. त्याचवेळी त्यांचे वजन सुमारे पाच किलोने कमी झाले होते. (Express Archive Photo)

  • 5/6

    १० जूनची गोष्ट आहे. रामदेवबाबा यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले होते की, रामदेवबाबा यांच्या शरीरातील अनेक घटक कमी झाले होते. त्यांना आयसीयूच्या समोरील खोलीत ठेवण्यात आले होते. त्यांना सलाईन बरोबर व्हिटामिन्स दिले होते. सलाईन सॉल्यूशन अतिशय छान असते.  ज्यांना डिहायड्रेशनचा धोका असतो अशा परिस्थितीत मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा लोकांना "सलाईन सोल्यूशन" दिल्या जाते. त्यांनंतर 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे   श्रीश्री रविशंकर रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी रामदेवबाबा यांचे उपोषण सोडले. आचार्य बाळकृष्ण देखील यावेळी रामदेवबाबासमवेत रूग्णालयात होते. (Express Archive Photo)

  • 6/6

    तसेच, २३ ऑगस्ट २०१९ रोजी आचार्य बाळकृष्ण यांची प्रकृती अचानक बिघडली होती. तेव्हा ते बेहोश झाल्याचे सांगितल्या जाते. त्यांना तातडीने पतंजली योगपीठाजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय तपासणी केलेल्या डॉक्टरांनी सांगितले होते की, "जेव्हा बाळकृष्ण रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा ते बोलत नव्हते. सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. पण परंतु न्यूरो लक्षात त्यांना एम्समध्ये रेफर केले". त्यानंतर ऋषिकेश येथील एम्समध्ये बाळकृष्ण यांना नेण्यात आले, तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी काही माध्यमांमध्ये आली होती. (Express Archive Photo)

Web Title: Ramdev baba who called allopathy a stupid science had also resorted to allopathy srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.