• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. amit shah is one of the richest ministers in india the names of other 7 ministers are also in the list srk

भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांमध्ये अमित शाहांचा समावेश; अन्य ७ मंत्र्यांचेही यादीत नाव; जाणून घ्या एकूण संपत्तीबद्दल

केंद्र सरकारमधील ७० टक्के मंत्री कोट्याधीश आहेत, अशा ७ मंत्र्यांविषयी आपण जाणून घेऊया.

July 27, 2021 18:38 IST
Follow Us
  • मोदी सरकारने आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यात ४३ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. यासह मोदी सरकारमधील मंत्र्यांची एकूण संख्या ७८ झाली आहे. यामध्ये बरेच नवीन चेहरे समाविष्ट केले गेले आणि काहींना डच्चू दिला आहे. केंद्र सरकारमधील ७० टक्के मंत्री कोट्याधीश आहेत. अशा ७ मंत्र्यांविषयी आपण जाणून घेऊया. खाली दिलेली मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मालमत्तेचा तपशील दिला आहे.  (Image: Amit Shah and Rajnath Singh Twitter)
    1/8

    मोदी सरकारने आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यात ४३ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. यासह मोदी सरकारमधील मंत्र्यांची एकूण संख्या ७८ झाली आहे. यामध्ये बरेच नवीन चेहरे समाविष्ट केले गेले आणि काहींना डच्चू दिला आहे. केंद्र सरकारमधील ७० टक्के मंत्री कोट्याधीश आहेत. अशा ७ मंत्र्यांविषयी आपण जाणून घेऊया. खाली दिलेली मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मालमत्तेचा तपशील दिला आहे.  (Image: Amit Shah and Rajnath Singh Twitter)

  • 2/8

    अमित शहा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकूण मालमत्ता ४० कोटींपेक्षा जास्त आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शहा यांना सहकारमंत्रीही केले गेले आहे. (Image: PTI)

  • 3/8

    राजनाथ सिंह – देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची एकूण मालमत्ता ५ कोटींपेक्षा जास्त आहे. (Image: Rajnath Singh Instagram)

  • 4/8

    अश्विनी वैष्णव- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची एकूण मालमत्ता १ कोटींपेक्षा जास्त आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना रेल्वेमंत्रीपद देण्यात आले आहे. (Image: Ashwni Vaishnav Instagram)

  • 5/8

    नितीन गडकरी- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची एकूण मालमत्ता 6 कोटींपेक्षा जास्त आहे. (Image: PTI)

  • हरदीपसिंग पुरी – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची एकूण मालमत्ता २२ कोटींपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर ५ कोटींहून अधिक कर्ज आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहील्या मंत्रिमंडळ विस्तारात, त्यांना नागरी उड्डाण मंत्री पदावरून काढून टाकले गेले आणि पेट्रोलियम मंत्रीपद दिले गेले. (Image: Hardeep Singh Puri Instagram)
  • 6/8

    निर्मला सीतारामन- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची एकूण मालमत्ता 2 कोटींपेक्षा जास्त आहे. (Image: PTI)

  • 7/8

    धर्मेंद्र प्रधान – देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची संपत्ती तीन कोटींपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर त्याच्यावर ८९ लाखाहून अधिक कर्जही आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहील्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना पेट्रोलियम मंत्रीपदावरून काढून शिक्षणमंत्री केले गेले (Image: Indian Express Archieve)

Web Title: Amit shah is one of the richest ministers in india the names of other 7 ministers are also in the list srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.