Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. from pf to disney plus hotstar subscription know the new rules from 1st september nrp

EPF पासून LPG पर्यंत… आजपासून बदलल्या ‘या’ गोष्टी; सर्वसामान्यांचा खिसा होणार खाली

September 1, 2021 18:30 IST
Follow Us
  • आज 1 सप्टेंबरपासून अनेक महत्त्वाच्या नियमात बदल करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.
    1/10

    आज 1 सप्टेंबरपासून अनेक महत्त्वाच्या नियमात बदल करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.

  • 2/10

    आधार-पॅन लिंक करण्यापासून एलपीजी सिलिंडरपर्यंत तर ईपीएफपासून चेक क्लियरिंगपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत.

  • 3/10

    आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमत वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

  • 4/10

    तर व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ७५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

  • 5/10

    आधार-पीएफ लिंक करणे : तुमचे पीएफ खाते आधारशी जोडणे अनिवार्य झाले आहे. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड क्रमांक पीएफशी जोडला नसेल तर संबंधित कंपनी तुमच्या PF खात्यात पैसे जमा करु शकणार नाही.

  • 6/10

    जर तुम्हीही प्रत्येक पेमेंट चेकने करत असाल, तर तुमच्यासाठी हा बदल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. आजपासून जर एखाद्याने ५० हजारांपेक्षा जास्त रुपयांचा धनादेशजारी केला तर तो व्यक्ती अडचणीत येऊ शकतो. आजपासून अनेक बँकांनी positive pay system लागू केली आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.

  • 7/10

    पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे अॅमेझॉन या कंपनीने डिलिव्हरी चार्जेसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हा नवा नियम लागू होणार आहे. यामुळे अॅमेझॉनवर सामान मागवणं महाग होणार आहे.

  • 8/10

    आजपासून Disney plus hotstar चे सब्सक्रिप्शन महागणार आहे. यामुळे युजर्सला बेस प्लॅनसाठी 399 ऐवजी 499 रुपये द्यावे लागणार आहेत. तर 899 च्या सब्सक्रिप्शन पॅकमध्ये ग्राहकांना दोन फोनमध्ये हॉटस्टार वापरता येणार आहे. या सब्सक्रिप्शनमध्ये एचडी क्वालिटी मिळेल.

  • पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना आजपासून त्यांच्या बचत खात्यातील ठेवींवर कमी व्याज मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने बचत खात्यांवरील व्याज दर 3 टक्क्यांवरून कमी करून 2.90 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे.
  • आजपासून गुगलची नवी पॉलिसी लागू करण्यात आली आहे. यामुळे फेक कंटेट प्रमोट करणाऱ्या अॅप्लिकेशनवर निर्बंध लावण्यात येणार आहे. तसेच अनेक नियमही कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना गुगलचा वापर सुरक्षितरित्या करता येणार आहे.

Web Title: From pf to disney plus hotstar subscription know the new rules from 1st september nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.