Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important points of pm narendra modi speech after 100 crore corona vaccination pbs

PM Modi Speech : लसीकरणातील ‘VIP कल्चर’ ते १०० कोटी लसी, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

भारताने करोना लसीकरणात १०० कोटींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधन केलं. यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यातील १० महत्त्वाचे मुद्दे.

October 22, 2021 10:59 IST
Follow Us
  • 21 ऑक्टोबर रोजी भारताने 1 बिलियन म्हणजेच 100 कोटी लसींचे डोसचा कठीण पण असामान्य लक्ष्य प्राप्त केलं. हे लक्ष्य प्राप्त करण्यामागे 130 कोटी देशवासीयांची कर्तव्यशक्ती आहे. त्यामुळे हे यश भारताचं यश आहे, प्रत्येक भारतीयाचं यश आहे. : पंतप्रधान मोदी
    1/10

    21 ऑक्टोबर रोजी भारताने 1 बिलियन म्हणजेच 100 कोटी लसींचे डोसचा कठीण पण असामान्य लक्ष्य प्राप्त केलं. हे लक्ष्य प्राप्त करण्यामागे 130 कोटी देशवासीयांची कर्तव्यशक्ती आहे. त्यामुळे हे यश भारताचं यश आहे, प्रत्येक भारतीयाचं यश आहे. : पंतप्रधान मोदी

  • 2/10

    जगातील दुसऱ्या मोठ्या देशांना लसीवर संशोधन करणे, लस शोधणं यात मागील अनेक दशकांचा अनुभव आणि तज्ज्ञता होती. मात्र, भारत या देशांनी बनवलेल्या लसींवरच जास्त अवलंबून राहत होता. आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना जगातील इतर देशांशी करत आहे. : मोदी

  • 3/10

    भारताने ज्या वेगाने 100 कोटी म्हणजेच 1 बिलियन लसींचा आकडा पार केला त्याचं कौतुक होत आहे. मात्र, मात्र या विश्लेषणात भारताने सुरुवात कोठून केली होती ही गोष्ट कायम सुटून जाते. : मोदी

  • 4/10

    भारताच्या लोकांना लस मिळेल की नाही? करोना साथीचा रोग नियंत्रणासाठी भारताच्या इतक्या लोकांचं लसीकरण होणार की नाही? असे अनेक प्रश्न विचारले गेले. मात्र, आज 100 कोटी लसीचे डोस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. : मोदी

  • 5/10

    भारत या जागतिक साथीरोगाचा सामना करू शकेल का? भारत इतर देशांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात लस खरेदीसाठी कोठून पैसे आणणार? भारताला लस कधी मिळणार? 100 वर्षातील सर्वात मोठा साथीरोग आला तेव्हा भारतावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. : मोदी

  • 6/10

    सर्वांना सोबत घेऊन देशाने ‘सबको व्हॅक्सीन-मुफ्त व्हॅक्सीन’ अभियान सुरू केलं. गरीब-श्रीमंत, गाव-शहर, दुर्गम-अतीदुर्गम, देशाचा एकच मंत्र राहिला की जर आजार भेदभाव करत नाही, तर लसीकरणात देखील भेदभाव होऊ शकत नाही. त्यामुळे लसीकरण अभियानावर ‘VIP कल्चर’चा शिरकाव होणार नाही याची काळजी घेण्यात आली. : मोदी

  • 7/10

    कोरोना साथीरोगाच्या सुरुवातीला भारतासारख्या लोकशाहीत करोनाचा सामना करणं कठीण होईल, अशी शंका व्यक्त करण्यात आली. भारतासाठी आणि भारतातील लोकांबाबत संयम आणि शिस्त कशी लागू होईल असंही बोललं गेलं. मात्र, आमच्यासाठी लोकशाहीचा अर्थ आहे सर्वांची सोबत. : मोदी

  • 8/10

    भारताचं संपूर्ण लसीकरण अभियान विज्ञानाच्या कुशीत जन्मलं, वैज्ञानिक निकषांवर विकसित झालं आणि वैज्ञानिक पद्धतींनुसार चारही दिशांना पोहचलं. भारताची लसीकरण मोहीम Science Born, Science Driven आणि Science Based राहिली यावर सर्वांना गर्व असला पाहिजे. : मोदी

  • 9/10

    जसं स्वच्छ भारत अभियान एक जनांदोलन आहे, तसेच भारतात तयार झालेली, भारतीयांनी तयार केलेली वस्तू खरेदी करणं, Vocal for Local होणं आपल्या व्यवहारात यायला हवं. जी वस्तू भारतीयांच्या घामातून तयार झालीय अशीच प्रत्येक छोट्यात छोटी वस्तू खरेदी करायला हवी. हे सर्वांच्या प्रयत्नानेच शक्य होईल. : मोदी

  • 10/10

    सुरक्षा कवच कितीही उत्तम असो, आधुनिक असो, गॅरंटी असलेलं असो जोपर्यंत करोनासोबत युद्ध सुरू आहे तोपर्यंत हत्यार खाली ठेवायचं नाही. आपल्याला सण साजरे करताना पूर्ण सतर्कता पाळायची आहे. : मोदी

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiलसीकरणVaccination

Web Title: Important points of pm narendra modi speech after 100 crore corona vaccination pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.