-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२५ नोव्हेंबर) उत्तर प्रदेशमधील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. हे विमानतळ कसं असणार याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. त्याचं प्रस्तावित डिझाईन असं असणार आहे.
-
हे विमानतळ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होईल असं अपेक्षित आहे. हे दिल्ली एनसीआरमधील अशाप्रकारचं दुसरं विमानतळ आहे.
-
नोएडा विमानतळ जवळपास ५,००० एकर जमिनीवर विकसित होणार आहे. याचा अंदाजित खर्च २९,५६० इतका आहे.
-
या विमानतळाविषयी बोलताना केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असेल.
-
हे विमानतळ नवी दिल्लीपासून १०० किलोमीटर अंतरावर असणार आहे.
-
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हजर होते.
-
जेवर येथे झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकांनी हजेरी लावली. यावेळी मोदी मोदीच्या घोषणांही ऐकायला मिळाल्या.
Photos : पंतप्रधान मोदींनी पायाभरणी केलेलं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कसं असणार? पाहा फोटो…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२५ नोव्हेंबर) उत्तर प्रदेशमधील जेवर येथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. हे विमानतळ कसं असणार याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.
Web Title: Photos of noida international airport at jewar proposed design pbs