-
आक्रमण करणाऱ्यांनी या नगरीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात : नरेंद्र मोदी
-
औरंगजेबाने तलवारीच्या बळावर भारतात बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे. येथे औरंगजेब आला तर शिवाजी देखील उभे ठाकले : नरेंद्र मोदी
-
कुणी सालार मसूद आला तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची ताकद दाखवून देतात. इंग्रजांच्या काळात देखील काशीच्या लोकांनी हेस्टिंगचे काय हाल केले होते हे येथील लोकांना माहिती आहे : नरेंद्र मोदी
-
देशासाठी मला तुमच्याकडून ३ वचने हवी आहेत. स्वच्छता, सृजनशिलता आणि आत्मनिर्भर भारतासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही ती ३ वचनं आहेत : नरेंद्र मोदी
-
प्रत्येक भारतीयाच्या हातांमध्ये अकल्पनीय असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची ताकद आहे. आम्हाला तप, तपस्या माहिती आहे. विनाश करणाऱ्यांची शक्ती कधीही भारताच्या शक्ती-भक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही : नरेंद्र मोदी
-
अनेक वर्षांच्या गुलामगिरीने आपल्यावर परिणाम केला होता, भारताला हीन भावनेने भरून टाकलं होतं. मात्र, आजचा भारत त्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे : नरेंद्र मोदी
-
आजचा भारत केवळ सोमनाथ मंदिराचं सौंदर्यीकरणच करत नाही, तर समुद्रात हजारो किलोमीटर ऑप्टिकल फायबर देखील पसरवत आहे. आजचा भारत केदारनाथचा जिर्णोद्धारच करत नाही, तर स्वतःच्या हिमतीवर अंतराळात भारतीयांना पाठवण्याच्या तयारीत आहे. आजचा भारत केवळ अयोद्ध्येत प्रभु रामांचं मंदीरच बनवत नाही, तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज देखील बनवत आहे : नरेंद्र मोदी
-
भगवान विठ्ठलाच्या कोट्यावधी भक्तांच्या आशिर्वादाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम पालखी मार्गाचं कामही काही आठवड्यांपूर्वी सुरू झालं आहे : नरेंद्र मोदी
-
आधी काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर केवळ ३ हजार चौरस फूट होता. आता हा परिसर जवळपास ५ लाख चौरस फूट झाला आहे. आता मंदिर आणि परिसरात 50 ते 75 हजार श्रद्धाळू बसू शकतात : नरेंद्र मोदी
-
काशीत स्वतः अन्नपूर्णा माता आहे. काशीतून चोरलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती एका शतकानंतर आता पुन्हा काशीत आणली जाणार आहे : नरेंद्र मोदी
Photos “औरंगजेबाने तलवारीच्या बळावर…”, शिवाजी महाराजांच्या उदाहरणासह मोदींच्या भाषणातील १० मुद्दे
शिवाजी महाराजांचं उदाहरण देत औरंगजेबावर तलवारीच्या बळाचा वापर केल्याचा आरोप ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी मार्गापर्यंत पंतप्रधान मोदींच्या भाषणातील १० मुद्दे.
Web Title: Pm narendra modi kashi corridor inauguration speech 10 important points pbs