Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of top big 10 international news of the year 2021 flashback year ender pbs

Flashback 2021 Photos : अमेरिकेच्या संसदेवर हल्ला ते तालिबानचा उदय, जगाचं लक्ष वेधणाऱ्या २०२१ मधील ‘या’ १० घडामोडींचे फोटो पाहा…

जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या, जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वर्ष २०२१ मधील महत्त्वाच्या १० घडामोडींचा आढावा.

December 31, 2021 18:33 IST
Follow Us
  • २०२१ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. अशावेळी नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये प्रवेश करताना मागील वर्षाकडे वळून पाहिलं तर अशा अनेक घटना आहेत ज्यांनी जगाला हादरवलं. यात जगाची महासत्ता असं बिरूद मिरवणाऱ्या अमेरिकेत झालेलं सत्तांतर आणि त्याआधी थेट वॉशिंग्टन डीसीत झालेल्या दंगली, स्फोट आणि एकूणच हिंसाचारापासून दहशतवादी संघटना तालिबानचा अफगाणिस्तानमधील उदय अशा अनेक घटनांचा समावेश आहे. या अशाच जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या, जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वर्ष २०२१ मधील महत्त्वाच्या १० घडामोडींचा आढावा.
    1/16

    २०२१ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. अशावेळी नव्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये प्रवेश करताना मागील वर्षाकडे वळून पाहिलं तर अशा अनेक घटना आहेत ज्यांनी जगाला हादरवलं. यात जगाची महासत्ता असं बिरूद मिरवणाऱ्या अमेरिकेत झालेलं सत्तांतर आणि त्याआधी थेट वॉशिंग्टन डीसीत झालेल्या दंगली, स्फोट आणि एकूणच हिंसाचारापासून दहशतवादी संघटना तालिबानचा अफगाणिस्तानमधील उदय अशा अनेक घटनांचा समावेश आहे. या अशाच जगावर खोलवर परिणाम करणाऱ्या, जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वर्ष २०२१ मधील महत्त्वाच्या १० घडामोडींचा आढावा.

  • 2/16

    २०२१ मध्ये जगाची महासत्ता आणि प्रगल्भ लोकशाही मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या संसदेवर तत्कालीन मावळते राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनीच हल्ला केला. यामुळे जगभरात प्रचंड खळबळ उडाली होती. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या उद्देशाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी ‘कॅपिटॉल’ या संसदेच्या इमारतीमध्ये धुडगूस घातला.

  • 3/16

    या वेळी हिंसाचारात अनेक लोकांना आपला जीवही गमवावा लागला. आधी ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल अमान्य करत घोटाळ्याचा आरोप केला. मात्र, अखेर अमेरिकी संसदेने बायडेन-कमला हॅरिस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःचा पराभव मान्य केला. विशेष म्हणजे हिंसा भडकावणारे ट्वीट केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट देखील निलंबित करण्यात आलं.

  • 4/16

    अफगाणिस्तानमधील कट्टरतावादी संघटना तालिबानने अमेरिकन सैन्याने माघारीची घोषणा करताच डोकं वर काढलं आणि अफगाण सैन्याला पराभूत करत सत्तापालट केला. यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये शरिया या धार्मिक कायद्याची अंमलबजावणी करत महिलांवर अनेक निर्बंध लादले.

  • 5/16

    अमेरिकेने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानातून एकूण १,२३,००० लोकांना बाहेर काढले आहे. यामध्ये अमेरिकन नागरिकांसह अमेरिकीच्या सहकारी मित्र देश आणि अफगाण नागरिकांचा समावेश होता. ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहीम ठरली. या काळात अफगाणमधील तालिबानी राजवटीच्या भीतीने मिळेल त्या मार्गाने जीवाचा आटापिटा करत आपल्या मुलाबाळांसह स्थलांतर करणाऱ्या नागरिकांच्या फोटोंनी जग हेलावलं होतं. यासह अमेरिकेची २० वर्षांपासून अफगाणिस्तानातील लष्करी उपस्थितीही संपली.

  • 6/16

    मार्च २०२१ मध्ये इजिप्तमधील सुएझ कालव्यात एक महाकाय मालवाहू जहाज अडकलं आणि जगभरातील व्यापार ठप्प झाला. युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानंतर अखेर ५ दिवसांनंतर हे जहाज काढण्यात आणि कालव्यातील आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग सुरू करण्यात यश आलं. यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाला.

  • 7/16

    पनामाचा ध्वज असलेले एव्हर गिव्हन नावाचं मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात ते जहाज अडकून पडलं, त्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती. हे अवाढव्य जहाज कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक अडकून पडलं होतं. मंगळवारपासून या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पाच दिवसांनंतर म्हणजेच रविवारी सायंकाळी या प्रयत्नांना यश आलं. रॉयटर्सने केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्याने या जहाजाला बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.

  • 8/16

    करोना संसर्गाने २०२१ मध्ये जगभरात पुन्हा डेल्टा व्हॅरिएंटच्या संसर्गामुळे खळबळ उडाली. वेगाने संसर्ग करणाऱ्या डेल्टा व्हॅरिएंटमुळे करोनाच्या पुढील लाटेला चालना मिळाली. इतकंच नाही, तर याच २०२१ मध्ये ओमायक्रॉन या आणखी एका नव्या करोना विषाणूने जगाची काळजी वाढवली. एकूणच डिसेंबर २०१९ मध्ये वुहानमध्ये सुरू झालेल्या करोनाची तीव्रता कमी होऊन गाडी रूळावर येत असतानाच २०२१ मध्ये करोनाच्या नव्या विषाणूंनी नवं आव्हान उभं केलं.

  • 9/16

    २०२१ मध्ये इस्रायलचं लष्कर आणि हमास या पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटनेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. इस्रायल आणि पॅलेस्टाइन हा संघर्ष मागील अनेक वर्षांपासून चालत आला आहे. मात्र, यावेळी जुन्या जेरुसलेम शहराजवळ दोन्ही बाजूने हल्ले झाले. ज्यू, ख्रिश्चन, मुस्लीम आणि अर्मेनियन लोकांसाठी महत्वाचं धार्मिक स्थळ असणाऱ्या या ठिकाणाला जवळजवळ युद्धभूमीचं स्वरुप आलं होतं. यावेळी हमासने इस्रायलवर १६०० हून अधिक रॉकेट्स डागल्याचा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला होता. यापैकी ४०० रॉकेट्स गाझा पट्टीमध्येच पडली. इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम या प्रणालीने सुमारे १०० रॉकेट्स आकाशातच निकामी केले.

  • 10/16

    या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमधील ६०० ठिकाणांवर हल्ला केल्याचं असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं. दुसरीकडे गाझा पट्टीमध्ये तळ ठोकून बसलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनाही इस्रायलवर रॉकेट्सच्या माध्यमातून हल्ले सुरुच ठेवले. गाझामध्ये इस्रायलकडून सातत्याने होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. याशिवाय हजारो लोक जखमी झाले. सरीकडे दक्षिण इस्रायलमध्येही पॅलेस्टिनी कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला. यात लहान मुलांचाही संमावेश होता.

  • 11/16

    मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन जगभरात चर्चेचा विषय ठरलं. विशेष म्हणजे दिल्लीत केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र निर्माण झालं होतं. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं होतं. शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले, रस्त्यावर मोठे खड्डे करण्यात आले, कॉक्रिटच्या भिंती तयार करण्यात आल्या. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना आणि जागतिक पातळीवर तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली होती.

  • 12/16

    ग्रेटानं ट्विट करत म्हटलं, “भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत.” रिहानानंही शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. आपण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत का नाहीत? असा सवाल तिने ट्विटद्वारे केला होता. अखेर २०२१ मध्येच शेतकरी आंदोलनासमोर झुकत मोदी सरकारने आपले महत्त्वकांक्षी ३ कृषी कायदे मागे घेतले.

  • 13/16

    विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून भारतात हिंदुत्ववादी संघटनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या या व्यक्तींंविरोधात आंदोलने केल्याचंही दिसून आलं.

  • 14/16

    २०२१ मध्ये इस्रायलच्या गुप्तहेर तंत्रज्ञान संस्था एनएसओने विकसित केलेल्या पेगॅसस या सॉफ्टवेअरचा वापर करून झालेला हेरगिरीचा मुद्दाही चांगलाच गाजला. जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाइल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यानंतर व्हॉटसअ‍ॅप या अमेरिकेच्या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयातही खेचलंय. यासोबत अॅपलने देखील खटला दाखल केला आहे. दरम्यान, पेगॅससचा वापर करून हेरगिरीच्या प्रकरणांमध्ये ३०० हून अधिक भारतीय मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे.

  • 15/16

    जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे. एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत. मॅगझिननुसार, एलन मस्क यांची निवड त्यांच्या अंतराळातील कामासाठी तसेच इलेक्ट्रिक कारसाठी करण्यात आली आहे. “पर्सन ऑफ द इयर एखाद्या व्यक्तीचा प्रभाव प्रतिबिंबित करतो आणि पृथ्वीवरील किंवा पृथ्वीच्या बाहेरील जीवनावर छाप पाडणारे कमी लोक आहेत. एलन मस्क हे २०२१ मध्ये आपल्या समाजातील बदलाचे सर्वात मोठे उदाहरण आहेत.”, असे गौरवोद्गार टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थनल यांनी काढले.

  • 16/16

    इस्रायलमधील इलात शहरात झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेत (मिस युनिर्व्हस) भारताच्या हरनाज संधू हिने विश्वसुंदरीचा किताब पटकावला. ती मूळची चंडीगडची आहे. ७९ देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेची विजेता म्हणून संधूला घोषित करण्यात आले, तर पॅराग्वेची नादिया फेरिराला द्वितीय आणि दक्षिण आफ्रिकेच्या लालेला म्स्वानो हिला तृतीय स्थान मिळाले.

TOPICS
New Year 2025नववर्ष २०२५आंतरराष्ट्रीय बातम्याInternational News

Web Title: Photos of top big 10 international news of the year 2021 flashback year ender pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.