• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos security breach in pm narendra modis convoy punjab hussainiwala stuck on a flyover for 15 20 minutes scsg

Photos: फ्लायओव्हरवर अडकलेला ताफा, कारमध्ये बसलेले PM मोदी, सुरक्षारक्षकांचा वेढा अन्…; पाहा नक्की काय घडलं

केंद्रीय गृहमंत्रालयाने नक्की काय घडलं यासंदर्भातील माहिती जारी केलीय.

January 5, 2022 15:53 IST
Follow Us
    • PM Narendra modi punjab security lapse
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षेसंदर्भातील मोठी चूक झाल्याने मोदींची सभा रद्द करण्यात आलीय. मोदींचा ताफा अडवल्याने त्यांची सभाच रद्द करावी लागली आहे.
    • केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले. तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते.
    • 1/9

      मात्र पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याचा पर्याय टाळण्यात आला. तरी भटिंडामध्ये पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता.

    • 2/9

      गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक ती सर्व पूर्तता करण्यात आल्याची खात्री केल्यानंतर ताफा हुसैनीवालाच्या दिशेने रवाना झाला.

    • 3/9

      मात्र हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले.

    • 4/9

      पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे मंत्रालयाने सांगितलं आहे.

    • 5/9

      मोदींचा ताफ उड्डाणपुलावर अडकून पडला त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी गाड्यांना चारही बाजूने घेरलेलं होतं.

    • 6/9

      पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.

    • 7/9

      पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी पुढे न जाता मागे फिरण्याचा निर्णय घेण्यात आला. (पहिले चार फोटो फाइल फोटो आहेत. उर्वरित फोटो आजचे असून सर्व फोटो एएनआयवरुन साभार)

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos security breach in pm narendra modis convoy punjab hussainiwala stuck on a flyover for 15 20 minutes scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.