-
संपूर्ण जग सध्या करोनाच्या प्रादुर्भावाने पुन्हा एकदा चिंतेत आहे. रोज लाखो नागरिकांना करोनाचा संसर्ग होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरामध्ये दहशतीचं वातावरण आहे. हा विषाणू सध्या जगातील ११० देशांमध्ये पसरलाय. जगभरामध्ये अनेक रुग्णालयांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.
-
काही देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे प्राणही गेलेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही या विषाणूला हलक्यात घेऊ नका असा इशारा दिलाय. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी करोनाचा हा नवा विषाणू कमी प्रभावी असला तरी याला हलक्यात घेण्याची चूक करु नये असं म्हटलंय. हा विषाणू त्याचा होणारा संसर्ग यासारख्या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात…
-
इतर व्हेरिएंटपेक्षा किती घातक? > मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेला हा ओमायक्रॉन व्हिडीओ सध्या जगभरामध्ये वेगाने पसरतोय. मात्र या विषाणूसंदर्भात वैज्ञानिकांकडे फारशी माहिती उपलब्ध नसून अद्याप यावर संशोधन सुरु आहे.
-
या विषाणूबद्दलचं संशोधन सुरु असून डेटा गोळा केला जातोय. सध्या जेवढी माहिती समोर आलीय त्यावरुन असं दिसून आलंय की हा विषाणू फार वेगाने पसरतोय. म्हणजेच अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा विषाणू फार वेगाने पसरतोय. महाराष्ट्रामध्येही या विषाणूचा संसर्ग झालेले अनेक रुग्ण आढळून आलेत.
-
किती दिवसांमध्ये दिसतात लक्षणं? > करोनाच्या या नवीन विषाणूचा संसर्ग झालाय की नाही हे समजण्यासाठी जीनोम सीक्वेन्सिंगचा वापर करावा लागतो. या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लगाल्यानंतर काही देशांमध्ये रॅपिड किट्सही वापरली जात आहेत.
-
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार यापूर्वी करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये लक्षणं दोन दिवसांच्या कालावधीपासून १४ दिवसांच्या कालावधीमध्ये दिसायची. मात्र ओमायक्रॉन हा फार धोकायदायक आहे.
-
ओमायक्रॉनची लक्षणं केवळ तीन ते पाच दिवसांमध्ये दिसू लागतात. ब्रिटनच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने हा विषाणू डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही वेगाने पसरतोय असं म्हटलंय.
-
ओमायक्रॉन एवढ्या वेगाने का पसरतोय? >> या विषाणूचा वेगाने होणारा संसर्ग आणि त्यानंतर दिसणारी लक्षणं याचा अभ्यास करुन हा विषाणू वेगाने पसरण्यामागील कारणांबद्दल अंदाज बांधले जातायत. यामध्ये अगदी लसींच्या परिणामकारकतेबद्दलही संशोधन करणं आणि अंदाज व्यक्त केले जात आहे.
-
ओमायक्रॉन हा विषाणू फार वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गाच्या माध्यमातून पसरतो. मात्र लोक यासंदर्भातील चाचण्या उशीरा करतात. तोपर्यंत त्याच्या माध्यमातून इतरांना लागण झालेली असते.
-
ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होण्याचा हा वेग इतका अधिक आहे की एकाकडून दुसऱ्याला आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याला संसर्ग होता पुढील व्यक्तीला आयसोलेट करण्याची आणि इतर उपाययोजना करण्याची संधीही मिळत नाही.
-
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विषाणूचा इंक्यूबेशनचा कालावधी म्हणजेच संसर्गचा आणि तो पसरण्याचा कालावधी जेवढा कमी तो विषाणू तेवढाच अधिक घातक असतो.
-
इतर व्हेरिएंटपेक्षा लक्षणं वेगळी आहेत का? >> या विषाणूसंदर्भातील अहवालानुसार याचा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणं ही वेगळी आहे. याचमुळे लोकांना आपल्याला संसर्ग झालाय हे लवकर समजत नाही.
-
आधीच्या व्हेरिएंटमध्ये खोकला, सर्दी, ताप आणि चव तसेच वास घेण्याची क्षमतेवर परिणाम अशी लक्षणं दिसायची. मात्र ओमायक्रॉनच्या लक्षणांमध्ये घशातील खवखव, शरीराच्या कंबरेखालच्या भागामध्ये अंगदुखी, वाहतं नाक, डोकेदुखी, स्नायूदुखी, शिंका येणे, रात्री फार घाम येणे अशी लक्षणं दिसून येतात.
-
किती दिवसात बरे होतात रुग्ण? >> ब्रिटनमधील एका अहवालानुसार ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांपासून एका आठवड्याच्या कालावधीमध्ये पूर्णपणे बरे होतात.
-
मात्र काही रुग्णांमध्ये खोकला आणि थकवा अशी लक्षणं बऱ्याच कालावधीसाठी दिसून येऊ शकतात. त्याचप्रमाणे काही रुग्णांना श्वास घेताना त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांना बरं होण्यासाठी १३ दिवसांचा कालावधी लागू शकतो. याचा संसर्ग सर्वच वयोगटात होत असल्याचं सांगितलं जातंय. (प्रातिनिधिक फोटो सर्व फोटो सौजन्य : रॉयटर्स)
Photos: एवढ्या वेगाने Omicron का पसरतोय? लक्षणं किती दिवसांनी दिसतात? रुग्ण किती दिवसात बरा होतो?
या विषाणूच्या संसर्गाचा वेग एवढा जास्त का आहे? संसर्ग झालेली व्यक्ती किती दिवसांमध्ये बरी होते?, अशा प्रश्नांची उत्तरे…
Web Title: Omicron symptoms transmission infection rate and other important information scsg