-
विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. मुलीच्या लग्नातील खर्चावरुनही आपल्याला गोवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
-
“माझ्या मुलीचं २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्न झालं. ईडी आणि इतर तपास यंत्रणा डेकोरेटर तसंच इतर कंत्राटांना समन्स बजावत असून धमकावत आहेत. माझ्याकडून ५० लाख रोख मिळाले असा जबाब देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांचा छळ केला जात आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
-
“माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनला ईडीवाल्यांन उचलून आणलं. हे त्यांचं काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं. ती मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत..मी कसे पैसे घेणार असं त्याने सांगितलं. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलं,” असं संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
-
“ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी आतापर्यंत बेकायदेशीरपणे २८ जणांना ताब्यात घेतलं आहे. यांनी ईडीच्या कार्यालयात बोलावून धमकावलं जात आहे. या सर्वांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं असून तासनतास बसवलं जात आहे. जर माझ्याविरोधात जबाब दिला नाही तर घऱी जाऊ देणार नाही आणि अटक करु इथपर्यंत धमकावलं जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
-
संजय राऊत यांची कन्या पुर्वशीचा २९ नोव्हेंबरला मुंबईत विवाह पार पडला.
-
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र मल्हार यांच्यासोबत संजय राऊतांची कन्या पूर्वशी विवाहबंधनात अडकली.
-
मुंबईतील रेनिसंस या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हे लग्न पार पडलं.
-
या लग्नाला अनेक मोठ्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
-
या विवाहसोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्निक राजभवनावर गेले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेत त्यांनी पत्रिका दिली होती.
-
२७ नोव्हेंबर मुंबईतील रेनिसंस हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रम पार पडला.
-
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम यावेळी आयोजित होता.
-
29 नोव्हेंबरला लग्न झाल्यानंतर १ डिसेंबरला ग्रँड हयात येथे स्वागत सोहळा पार पडला.
-
संजय राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राजेश नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.
-
तर नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याची माहिती आहे.
-
पूर्वशी राऊतने ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती केली होती.
PHOTOS: संजय राऊतांनी ज्या मुलीच्या लग्नावरुन टार्गेट केल्याचा आरोप केला आहे त्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?
मुलीच्या लग्नातील खर्चावरुनही आपल्याला गोवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप
Web Title: Shivsena sanjay raut alleges ed investigating daughter purvashi wedding photos sgy