• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai largest community 111 toilet block in india new suvidha center inaugurated in dharavi by cabinet minister aaditya thackeray photos sdn

Photos: आठ बाथरुमसह १० मोठ्या वॉशिंग मशीन असणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या ‘सुविधा केंद्राची’ धारावीत सुरूवात

February 10, 2022 10:11 IST
Follow Us
  • Mumbai Largest Community 111 Toilet Dharavi Photos
    1/18

    पालिकेने मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र धारावी परिसरात उभारले असून या सुविधा केंद्राचे लोकार्पण बुधवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. (फोटो सौजन्य : बृहन्मुंबई महानगरपालिका / ट्विटर)

  • 2/18

    या केंद्रामध्ये तब्बल १११ शौचकुपांसह आठ स्नानगृहे आणि कपडे धुण्यासाठी १० मोठ्या आकाराची यंत्रे आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 3/18

    या सुविधा केंद्राची उभारणी हिंदूस्तान युनिलिव्हर या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून करण्यात आली आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 4/18

    या सुविधा केंद्राचा परिसरातील सुमारे पाच हजार व्यक्तींना लाभ होणार आहे. (फोटो सौजन्य : बृहन्मुंबई महानगरपालिका / ट्विटर)

  • 5/18

    मुंबईकरांना स्वच्छतेच्या विविध सोयी-सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने मुंबईत विविध ठिकाणी सामुदायिक सुविधा केंद्रे उभारण्यात येत आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 6/18

    विशेष म्हणजे ही सुविधा केंद्रे विविध कंपन्यांच्या व संस्थांच्या सहकार्याने उभारण्यात येत आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 7/18

    ही सुविधा केंद्रे अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने उभारण्यात येत असून सौर ऊर्जेचा वापर, वापरलेल्या पाण्याचे चक्रीकरण करून पुन्हा वापर करण्यात येत असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी सांगितले. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 8/18

    मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि मे. युनायटेड वे मुंबई, मे. हिंदूस्थान युनिलिव्हर व एच.एस.बी.सी. या संस्थांच्या सहयोगातून, सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत जी उत्तर विभागातील धारावी पंपिंग परिसरात दुमजली सार्वजनिक सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 9/18

    या केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 10/18

    मुंबईत दहा ठिकाणी सुविधा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 11/18

    सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत मुंबईत विविध १० ठिकाणी सामुदायिक सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 12/18

    बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित संस्थांमध्ये बुधवारच्या कार्यक्रमात सामंजस्य करार करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : बृहन्मुंबई महानगरपालिका / ट्विटर)

  • 13/18

    त्यानुसार धारावीत प्रेम नगर, काळा किल्ला, घाटकोपरमध्ये भीम नगर, साईनाथ नगर, गोवंडीमध्ये टाटा नगर, तानाजी मालुसरे मार्ग, चेंबूरमध्ये गायकवाड नगर, सांताक्रूज (पूर्व)मध्ये दावरी नगर, कुचिकोरवे नगर, खेरवाडी या ठिकाणी ही सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. (फोटो सौजन्य : बृहन्मुंबई महानगरपालिका / ट्विटर)

  • 14/18

    सुविधा केंद्रात तब्बल १११ शौचकुपे असून ते देशातील सर्वात मोठे सामुदायिक सुविधा केंद्र ठरले आहे. (फोटो सौजन्य : बृहन्मुंबई महानगरपालिका / ट्विटर)

  • 15/18

    पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 16/18

    तसेच लहान मुले आणि अपंगांकरिता व्यवस्था करण्यात आलेली आहे. (फोटो सौजन्य : बृहन्मुंबई महानगरपालिका / ट्विटर)

  • 17/18

    या केंद्रामध्ये परिसरातील नागरिकांकरिता या सुविधा सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.वॉटर सिस्टीम, गरम पाण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल, कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्र, तसेच याद्वारे तयार होणारे सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी पाण्याचे पुनर्चक्रीकरण करणारा प्रकल्प अशा अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

  • 18/18

    या शौचालयामुळे धारावी उदंचन केंद्राच्या आसपासच्या परिसरातील नाईक नगर, संग्राम नगर, शताब्दी नगर इत्यादी ठिकाणच्या पाच हजार नागरिकांची सोय होणार आहे. (फोटो सौजन्य : बृहन्मुंबई महानगरपालिका / ट्विटर)

TOPICS
मराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Mumbai largest community 111 toilet block in india new suvidha center inaugurated in dharavi by cabinet minister aaditya thackeray photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.