-   रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशातील नागरिकांना शस्त्र हाती घेऊन आपल्या भूमीचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. 
-  युक्रेनमधील अनेक नागरिकांनी रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र उचलली आहेत. 
-  यात युक्रेन देशातील महिला देखील मागील राहिलेल्या नाहीत. 
-  युक्रेनच्या खासदार किरा रुडिक यांनी रशियाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे हाती घेतल्याचा फोटो शेअर केला होता. 
-  आता युक्रेनमधील सर्वात सुंदर महिलेने देखील देशाच्या संरक्षणासाठी शस्त्रे हाती घेतली आहेत. 
-  या युक्रेन सुंदरीचं नाव ‘अनास्तासिया लेना’ असं आहे. 
-  मिलिटरी युनिफॉर्म परिधान करत युक्रेन सुंदरी अनास्तासिया युद्धात शत्रूशी दोन हात करण्यास उतरली आहे. 
-  अनास्तासिया लेना हिने २०१५ साली मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये युक्रेन देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 
-  तुर्कीमध्ये पब्लिक रिलेशनशिप मॅनेजर म्हणून ती नोकरी करत होती. 
-  देशासाठी नोकरी आणि ग्लॅमर सोडून अनास्तासियाने हातात बंदूक घेतली आहे. 
-  अनास्तासियाने मिलिटरीचे ट्रेनिंग घेतले आहे. 
-  अशा युद्धजन्य परिस्थितीत स्वतःचे आणि देशवासियांचे रक्षण करण्यासाठी हे ट्रेनिंग कामी येईल अशी तिची अपेक्षा आहे. 
-  याचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. 
-  देशाच्या रक्षणासाठी शस्त्रे हाती घेतल्याचा संदेश अनास्तासिया फोटोंमधून देत आहे. 
-  “ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात युक्रेनची सीमा ओलांडल्यास मारले जाल”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. 
-  अनास्तासियाचे इन्स्टाग्रामवर १ लाख ८५ हजार फॉलोवर्स आहेत. 
-  इन्स्टाग्राम स्टोरी आणि पोस्टच्या माध्यमातून अनास्तासिया युक्रेनला मदत करण्यासाठी आवाहन करत असते. 
-  रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचे असमर्थन करणारी इन्स्टाग्राम स्टोरी देखील अनास्ताने शेअर केली होती. 
-  मातृभूमीच्या संरक्षणासाठी युद्धभूमीत उतरल्याने अनास्तासिया लेनाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 
-  शत्रूशी दोन हात करण्यासाठी सज्ज असलेली युक्रेन सुंदरी अनास्तासिया लेना. 
-  (सर्व फोटो : अनास्तासिया लेना/ इन्स्टाग्राम) 
Photos : मेकअप उतरवून परिधान केला लष्करी गणवेश; शत्रूशी दोन हात करण्यासाठी युक्रेन सुंदरी उतरली मैदानात
अनास्तासिया लेना हिने २०१५ साली मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये युक्रेन देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Web Title: Who is anastasiia lenna former miss grand ukrain joining army against russian troops kak