• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. richest 8 cities of india and richest person from these places pbs

Photos : भारतातील ८ सर्वात श्रीमंत शहरं आणि त्या शहरांमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? फोटो पाहा…

भारत जगाच्या पाठिवर जीपीडीमध्ये पाचव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात सध्या एकूण १६६ बिलियनर्स आहेत. त्यापैकी भारताच्या ८ सर्वात श्रीमंत शहरांमधील सर्वात श्रीमंत ८ व्यक्तींचा आढावा.

May 13, 2022 22:05 IST
Follow Us
  • भारत जगाच्या पाठिवर जीपीडीमध्ये पाचव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात सध्या एकूण १६६ बिलियनर्स आहेत. त्यापैकी भारताच्या ८ सर्वात श्रीमंत शहरांमधील सर्वात श्रीमंत ८ व्यक्तींचा आढावा.
    1/9

    भारत जगाच्या पाठिवर जीपीडीमध्ये पाचव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात सध्या एकूण १६६ बिलियनर्स आहेत. त्यापैकी भारताच्या ८ सर्वात श्रीमंत शहरांमधील सर्वात श्रीमंत ८ व्यक्तींचा आढावा.

  • 2/9

    १. मुकेश अंबानी (मुंबई)
    भारताची आर्थिक राजधानी आणि देशाचं सर्वात श्रीमंत शहर असलेल्या मुंबईतील सर्वात व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले मुकेश अंबानी रिलायन्सचे प्रमुख आहेत. त्यांची सध्या संपत्ती ८९.९ बिलियन डॉलर इतकी आहे. ते सध्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे.

  • 3/9

    २. शिव नदार (नवी दिल्ली)
    जीडीपीचा विचार केला तर दिल्ली भारताचं दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत शहर आहे. एचसीएलचे संस्थापक शिव नदार भारताचे तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्याकडे सध्या २५.६ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

  • 4/9

    ३. वेणुगोपाल बेंगूर (कोलकाता)
    वेणुगोपाल बेंगुर कोलकाता शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते श्री सिमेंटचे प्रमुख आहेत. त्यांची संपत्ती ६.७ बिलियन डॉलर आहे. ते देशातील १९ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

  • 5/9

    ४. अझीम प्रेमजी (बंगळुरू)
    आयटी क्षेत्रातील दिग्गज विप्रोचे माजी प्रमुख अझीम प्रेमजी भारताची सिलीकॉन व्हॅली समजल्या जाणाऱ्या बंगळुरूमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ते १२ व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे ९.१ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

  • 6/9

    ५. कलानिथी मरन (चेन्नई)
    कलानिथी मरन चेन्नईत राहणारे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते सन ग्रुपचे प्रमुख आहेत. ते २.२ बिलियन डॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत. देशातील ७७ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून मरन यांची नोंद आहे.

  • 7/9

    ६. मुरली दिवी (हैदराबाद)
    हैदराबादमधील वैज्ञानिक मुरली दिवी फार्मासिटीकल क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यांनी तीन दशकांपूर्वी दिवी लॅबरॉटरीची स्थापना केली. त्यांच्यासह कुटुंबाकडे एकूण ७.८ बिलियन डॉलरची संपत्ती आहे. ते देशातील १६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

  • 8/9

    ७. सायरस पुनावाला (पुणे)
    देशातील सातव्या क्रमांकाचं शहर आहे पुणे. या पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सीरम संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला हे आहेत. देशातील श्रीमंतांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २१.८ बिलियन डॉलर इतकी आहे.

  • 9/9

    ८. गौतम अदानी (अहमदाबाद)
    भारतातील आठव्या क्रमांकाचं शहर आहे गुजरातमधील अहमदाबाद. हे शहर श्रीमंतीच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर असलं तरी येथे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते. त्यांचं नाव आहे गौतम अदानी. अदानी समुहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदानी यांच्याकडे सध्या १०५.४ बिलियन डॉलरची संपत्ती आहे. यासह ते जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे.

TOPICS
गौतम अदाणीGautam Adaniमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Richest 8 cities of india and richest person from these places pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.