Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aditya thackeray tells development works and fund given to manmad nashik criticizes suhas kande prd

सुहास कांदे म्हणाले मनमाडसाठी काय केलं? आदित्य ठाकरेंनी विकासकामांची यादीच काढली, भर सभेत दिला हिशोब

आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली आहे.

July 22, 2022 15:41 IST
Follow Us
  • आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
    1/9

    आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

  • 2/9

    आदित्य ठाकरे यांचे मनमाडच्या विकासासाठी एक टक्कादेखील योगदान नाही, असा दावा कांदे यांनी केला.

  • 3/9

    तसेच आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प मी दिला आहे आणि त्यासाठी पैसे दिल्याचं सांगून दाखवावं, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना केले आहे.

  • 4/9

    कांदे यांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी त्यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी उत्तर द्यायला कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नाही, असे आदित्य ठारे म्हणाले आहेत.

  • 5/9

    मनमाड येथे सभेला संबोधित करत असताना आदित्य ठाकरे यांनी मनमाड येथे झालेल्या विकासकामांची तसेच या कामांसाठी दिलेल्या निधीची यादीच खिशातून बाहेर काढली.

  • 6/9

    यावेळी बोलताना, “जी वचनं होती ती पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही करत आहोत. पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही समजलेलं नाही. याआधी मी मनमाडमध्ये आलो होतो. आपले सरकार आले तर पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करेन, असे मी आश्वासन दिले होते,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 7/9

    “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी ३०० कोटी रुपये मंजूर करुन दिले. पण स्वत:साठी काहीही आरोप केले जात आहेत. या टीकांना मी उत्तरं देत बसणार नाही. गद्दार नसते तर उत्तरं दिली असती. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी कांदे यांचे नाव न घेता केली.

  • 8/9

    “शिवसैनिकांनी प्रश्न विचारले असते तर मी उत्तर द्यायला कटीबद्ध आहे. पण गद्दांराना मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी गद्दारी का केली, याचं उत्तर अगोदर द्यावं,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 9/9

    “पर्यटन खात्याला कधीही निधी मिळत नव्हता. मात्र आमच्या सरकारने पर्यटन खात्याला १७०० कोटी रुपये दिले. मनमाडमध्ये मी आठ कोटी रुपयांचा फंड दिला आहे,” अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली. (सर्व फोटो आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन साभार)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Aditya thackeray tells development works and fund given to manmad nashik criticizes suhas kande prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.