-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आपला ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने आज मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी आहे. उद्धव ठाकरेदेखील शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत.
-
कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. यावेळी सुद्धा हार-फुले, पुष्पगुच्छ आणू नका, मला शुभेच्छा रुपाने शिवसैनिका आणि पदाधिकाऱ्याचे प्रतिज्ञापत्र द्या, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले होते.
-
शिवसेनेतील ऐतिहासिक आणि अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिवसैनिकांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न होतो आहे. तसेच मातोश्रीबाहेर फुलांची सजावटही करण्यात आली आहे.
-
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानंतर आज शेकडो शिवसैनिकांनी मातोश्रीवर गर्दी केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
दरम्यान, शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना केक कापण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी लगेच होकार देत शिवसैनिकांची इच्छा पूर्ण केली.
-
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे आता पुन्हा शिवसेना उभी करण्याचे आव्हान असणार आहे.
Uddhav Thackeray Birthday : मातोश्रीवर शिवसैनिकांनी साजरा केला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आपला ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.
Web Title: Shivsena party president uddhav thackeray birthday celebration photo spb