• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. dhfl fraud cbi unearths paintings watches worth rs 12 and half crore bought allegedly from diverted funds scsg

Photos: साडेपाच कोटींची चित्रं, साडेपाच कोटी किमतीची २ घड्याळं अन्…;  ३४ हजार ६१५ कोटींच्या घोटाळा प्रकरणी CBI ची छापेमारी

सीबीआयने या प्रकरणी आतापर्यंत १० पेक्षा अधिक व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

July 29, 2022 10:12 IST
Follow Us
  • DHFL fraud CBI unearths paintings watches worth Rs 12 And Half crore bought allegedly from diverted funds
    1/9

    १७ बँकांच्या समुहाची ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईसह अन्य शहरांत नुकतेच छापे टाकून साडेबारा कोटी रुपये किमतीच्या वस्तू जप्त केल्या.

  • 2/9

    यामध्ये महागडी घड्याळे, चित्रे, सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

  • 3/9

    सीबीआयने या ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत १० पेक्षा अधिक व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

  • 4/9

    सीबीआयने जप्त केलेल्या महागड्या वस्तूंमध्ये एफ. एन. रझा आणि एफ. एन. सौझा यांनी रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांचा समावेश आहे.

  • 5/9

    छापेमारी करुन सीबीआयने स्वत:च्या ताब्यात घेतलेल्या या चित्रांची किंमत साडेपाच कोटी रुपये आहे.

  • 6/9

    तसेच या छापेमारीमध्ये प्रसिद्ध कंपन्यांची पाच कोटी रुपये किमतीची दोन घड्याळेही सीबीआयने जप्त केली आहेत. यातील काही वस्तू मुंबईतून जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • 7/9

    दोन कोटी रुपये किमतीच्या बांगड्या आणि सोने, हिऱ्याच्या दागिन्यांचाही समावेश सीबीआयने जप्त केलेल्या गोष्टींमध्ये आहे. गैरव्यवहारातील रकमेचा वापर करून आरोपींनी महागड्या वस्तूंची खरेदी केल्याचा सीबीआयला संशय आहे.

  • 8/9

    युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विपिन कुमार शुक्ला यांच्या तक्रारीनुसार युनियन बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षतेखालील १७ बँक समूहाची आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

  • 9/9

    आरोपींनी संगनमत करून १७ बँक समूहांकडून ४२ हजार ८७१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाची काही रक्कम इतरत्र वळवण्यात आली.

TOPICS
सीबीआयCBIसीबीआय चौकशीCBI Probe

Web Title: Dhfl fraud cbi unearths paintings watches worth rs 12 and half crore bought allegedly from diverted funds scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.