• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. property worth 390 crores seized in it raid in jalna sgy

गाड्यांवर ‘राहुल वेड्स अंजली’चे पोस्टर, वऱ्हाडी असल्याचं भासवत धाड, आठ दिवस तपास अन् ३९० कोटींचं घबाड, महाराष्ट्रभर चर्चा

अधिकाऱ्यांनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असे स्टिकर्स गाडीवर लावून एक कोडवर्ड तयार केला होता

August 11, 2022 16:32 IST
Follow Us
  • जालन्यात प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्रभर याची चर्चा रंगली आहे. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कऱण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आखलेल्या योजनेचीही चांगलीच चर्चा आहे.
    1/12

    जालन्यात प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्रभर याची चर्चा रंगली आहे. स्टील कारखानदार, कपडे व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपर यांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कऱण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आखलेल्या योजनेचीही चांगलीच चर्चा आहे.

  • 2/12

    जालन्यामधील स्टील कारखानदार तसंच इतर व्यापाऱ्यांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ ऑगस्टरला त्यांचं घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.

  • 3/12

    कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती.

  • 4/12

    छापे टाकले असता एकूण ३९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचं उघड झालं. यामध्ये ५८ कोटींच्या रोख रकमेसह, ३१ किलो सोन्याचे दागिने, १६ कोटींचे हिरे तसंच ३०० कोटींच्या स्थायी मालमत्तेचा समावेश आहे.

  • 5/12

    रोख रक्कम जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास मोजणी सुरु होती. स्टेट बँकेत सकाळी ११ वाजता सुरु केली मोजणी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती.

  • 6/12

    ही कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कमालीची योजना आखली होती, तसंच गुप्तता पाळली होती.

  • 7/12

    कोणालाही शंका येऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी गाड्यांवर ‘अंजली वेड्स राहुल’ असे पोस्टर्स लावून आपण वऱ्हाडी असल्याचं भासवलं होतं.

  • 8/12

    गाड्यांवर ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असे स्टिकर्स लावून एक कोडवर्डचं तयार करण्यात आलेला होता.

  • 9/12

    १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती.

  • 10/12

    प्राप्तिकर विभागाने सर्व मालमत्ता जप्त केली असून, कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे. यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

  • 11/12

    राज्यभरातील आयकर विभागाचे २६० अधिकारी, कर्मचारी या कारवाईच सहभागी झाले होते.

  • 12/12

    (Photos: ANI/Video Screengrab)

TOPICS
जालनाJalnaप्राप्तिकरIncome Tax

Web Title: Property worth 390 crores seized in it raid in jalna sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.