• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of various cms of different states in india celebrating independence day pbs

Photos : महाराष्ट्र, दिल्लीपासून त्रिपुरापर्यंत, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने कसा साजरा केला स्वातंत्र्य दिन? पाहा…

महाराष्ट्र, दिल्लीपासून त्रिपुरापर्यंत देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला याचा आढावा.

August 15, 2022 15:03 IST
Follow Us
  • महाराष्ट्र, दिल्लीपासून त्रिपुरापर्यंत देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला याचा आढावा.
    1/15

    महाराष्ट्र, दिल्लीपासून त्रिपुरापर्यंत देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला याचा आढावा.

  • 2/15

    भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठही यावेळी उपस्थित होते.

  • 3/15

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर आयोजित स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात ध्वजारोहण केले.

  • 4/15

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकातामधील रेड रोडवर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात तिरंगा फडकावला.

  • 5/15

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील विधान भवन परिसरात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य देखील उपस्थित होते. (फोटो सौजन्य – पीटीआय/नंद कुमार)

  • 6/15

    बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पाटणातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहण केले (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 7/15

    पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवत मान यांनी लुधियानामधील गुरुनानक देव स्टेडियमवरील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात ध्वजारोहण केले.

  • 8/15

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूमधील परेड मैदानावर राष्ट्रध्वज फडकावला.

  • 9/15

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हैदराबादमधील ऐतिहासिक गोलकोंडा किल्ल्यावर तिरंगा फडकावताना.

  • 10/15

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि स्वातंत्र्यसैनिक आर. नल्लकन्नू यांना राज्य सरकारचा मानाचा थगईसाल थमिझर पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

  • 11/15

    राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर स्वातंत्र्यदिन साजरा केला. (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 12/15

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देहरादूनमधील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सेवा पदक देऊन सन्मानित केलं. (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 13/15

    त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक शाह यांनी आगरताळा येथे स्वातंत्र्यदिनाच्या परेडचं निरिक्षण केलं. (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 14/15

    ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून भुवनेश्वर येथे एका प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 15/15

    गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सँकेलिम येथे आपल्या निवासस्थानी तिरंगा फडकावला. (फोटो सौजन्य – एक्स्प्रेस फोटो)

TOPICS
स्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Photos of various cms of different states in india celebrating independence day pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.