• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. five richest indians who own various sports teams in world spb

‘हे’ आहेत जगभरातील विविध क्रीडासंघाचे मालक असलेले पाच श्रीमंत भारतीय

भारतात आयपीएलच्या यशानंतर अनेक देशांमध्ये टी-२० लीग सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आगामी CSA T20 लीगच्या सर्व सहा फ्रँचायझी या आयपीएल संघांच्या मालकीच्या आहेत.

August 25, 2022 23:57 IST
Follow Us
  • भारतात आयपीएलच्या यशानंतर अनेक देशांमध्ये टी-२० लीग सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आगामी CSA T20 लीगच्या सर्व सहा फ्रँचायझी या आयपीएल संघांच्या मालकीच्या आहेत. जगभरातील स्पोर्ट्स फ्रँचायझी असलेल्या पहिल्या पाच श्रीमंत भारतीयांमध्ये शाहरूख खान आणि व्यावसायिक संजीव गोयंका यांच्याही समावेश आहे.
    1/6

    भारतात आयपीएलच्या यशानंतर अनेक देशांमध्ये टी-२० लीग सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आगामी CSA T20 लीगच्या सर्व सहा फ्रँचायझी या आयपीएल संघांच्या मालकीच्या आहेत. जगभरातील स्पोर्ट्स फ्रँचायझी असलेल्या पहिल्या पाच श्रीमंत भारतीयांमध्ये शाहरूख खान आणि व्यावसायिक संजीव गोयंका यांच्याही समावेश आहे.

  • 2/6

    बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान केवळ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मालक नाही, तर कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL), त्रिनबागो नाइट रायडर्स तसेच लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आणि UAE T20 लीगमधील अबू धाबी नाइट रायडर्सचादेखील सहमालक आहे.

  • 3/6

    RPSG समुहाचे अध्यक्ष संजीव गोयंका यांनी गेल्या वर्षीच आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स ही टीम विकत घेतली होती. मात्र, अलीकडेच त्यांनी CSA T20 लीगमध्ये डर्बन ही टीम विकत घेतली आहे. तसेच गोयंका हे प्रसिद्ध फुटबॉल क्लब एटीके मोहन बागानचेही सह-मालक आहेत.

  • 4/6

    GMR समूहाचे संस्थापक अध्यक्ष जी. एम. राव यांच्याकडे जगभरातील अनेक स्पोर्ट्स फ्रँचायझी आहेत. UAE च्या आगामी T20 लीगमधील दुबई ही टीम त्यांनी विकत घेतली आहे. तसेच GMR समूह आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचेदेखील सह-मालक आहेत, तर त्यांच्याकडे यूपी योद्धाची या कबड्डी टीमचीही मालकी आहे.

  • 5/6

    अदानी समूहाचे संस्थापक अध्यक्ष गौतम अदानी यांनी UAE च्या आगामी T20 लीगमध्ये फ्रँचायझी मिळवून क्रिकेट विश्वात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, अदानी स्पोर्ट्सलाइनने आयपीएल २०२२ मेगा लिलावातही भाग घेतला होता. मात्र, त्यांना यश आले नाही.

  • 6/6

    रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी हे IPL च्या सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (MI) चे प्रमुख मालक आहेत. त्यांनी अलीकडे UAE T20 लीगमध्ये ‘MI Emirates’ नावाची टीक विकत घेतली आहे. तसेच CSA T20 लीगमध्ये ‘ एम आय केप टाउन’ नावाची टीम विकत घेतली आहे

TOPICS
इंडियन क्रिकेटIndian Cricket

Web Title: Five richest indians who own various sports teams in world spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.