• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know all about professor parashram r arde his social work in anis with dr narendra dabholkar pbs

Photos : अंधश्रद्धांविरोधात लढा देणाऱ्या परशराम आर्डेंचं निधन, फिजिक्सचे प्राध्यापक ते डॉ. दाभोलकरांचे सहकारी, वाचा…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी राहिलेले प्रा. प. रा. आर्डे यांच्या कामाचा आढावा…

October 14, 2022 20:00 IST
Follow Us
  • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी राहिलेले प्रा. प. रा. आर्डे यांचे शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने भारती हॉस्पिटल सांगली येथे निधन झाले.
    1/28

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी राहिलेले प्रा. प. रा. आर्डे यांचे शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने भारती हॉस्पिटल सांगली येथे निधन झाले.

  • 2/28

    प्राध्यापक आर्डे ८२ वर्षाचे होते. त्यांचे इच्छेनुसार मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांचे भारती हॉस्पिटलमध्ये देहदान करण्यात आले.

  • 3/28

    प्राध्यापक आर्डे यांनी भौतिकशास्त्राचे (फिजिक्स) विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून ३२ वर्ष रयत शिक्षण संस्थेत सेवा केली होती.

  • 4/28

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सातारा येथे अंनिसच्या कार्याला सुरुवात केली आणि आर्डे यांनी १९८५ पासून अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या प्रबोधन व कृती कार्यक्रमात योगदान देण्यास सुरुवात केली.

  • 5/28

    प्राध्यापक आर्डेंनी बुवाबाजी संघर्ष वैज्ञानिक जाणिवा शिबिरे, शाळा महाविद्यालयातून अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर व्याख्याने, लेखन याद्वारे अंधश्रद्धांच्या विरोधात सातत्याने संघर्ष केला.

  • 6/28

    त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर ‘हसत-खेळत विज्ञान’ या द्विपात्री नाट्यप्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन केले.

  • 7/28

    या प्रयोगाचे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये हजारभर प्रयोग झाले.

  • 8/28

    बालचित्रवाणीवर या नाट्यप्रयोगाचे अनेक वेळा प्रसारण झाले.

  • 9/28

    सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ अंनिसच्या कामाला वाहून घेतले होते.

  • 10/28

    ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे १९ वर्षे संपादक म्हणून काम केले.

  • 11/28

    ते १९९५ पासून महाराष्ट्र अंनिसचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात सहसंपादक होते.

  • 12/28

    २००२ पासून ते २०१९ पर्यंत आर्डेंनी प्रमुख संपादक पदाचा कार्यभार सांभाळला.

  • 13/28

    अखेरच्या काळात ते वार्तापत्राच्या सल्लागार पदावर कार्यरत होते.

  • 14/28

    त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये व वार्तापत्रांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक जाणिवा या विषयावर विपुल लेखन केले.

  • 15/28

    त्यांनी दाभोलकर सोबत लिहलेल्या ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह, पूर्णविराम’ या राजहंस प्रकाशने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या ३० हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत.

  • 16/28

    त्यांनी खगोलशास्त्र, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मा पुर्नजन्म, प्लॅन्चेट, मुलांसाठी सोप्या भाषेत हसत खेळत विज्ञान या विषयावर पुस्तके लिहिली आहेत.

  • 17/28

    छद्मविज्ञान या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास होता.

  • 18/28

    त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे, अनेक संस्था चे पुरस्कार मिळाले होते.

  • 19/28

    प्रा. आर्डे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.

  • 20/28

    त्यांना मराठा समाज सांगली, पी. डी. पाटील कराड गौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

  • 21/28

    त्यांचे पश्चात पत्नी उषाताई, मुलगा विनय, मुलगी रुपा, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  • 22/28

    प्राध्यापक आर्डे यांनी अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम (डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा.प.रा.आर्डे), विज्ञान व अंधश्रद्धा (महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ अनुदान पुरस्कृत), आत्मा-पुनर्जन्म – प्लँचेट, वेध विश्वाचा मानवी शौर्याचा या ग्रंथांचं लेखन केलं.

  • 23/28

    प्राध्यापक आर्डे यांच्या निधनानंतर सामाजिक क्षेत्रातून आदरांजली दिली जात आहे.

  • 24/28

    वैज्ञानिक दृष्टिकोन तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कामाचंही कौतुक होत आहे.

  • 25/28

    विशेष म्हणजे प्राध्यापक आर्डे यांनी समाजातील अंधश्रद्धांचं निरसन करणारं साध्यासोप्या भाषेतील विपूल लेखन केलं.

  • 26/28

    प्रबोधनाच्या कामाचा भाग म्हणून ते स्वतः शाळा महाविद्यालयात गेले.

  • 27/28

    त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला.

  • 28/28

    तसेच नव्या पिढीत तार्किक विचार शक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. (सर्व फोटो सौजन्य – राहुल थोरात, अंनिस)

TOPICS
अंधश्रद्धाSuperstitionsअंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)Anisडॉ. नरेंद्र दाभोळकरDr Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरNarendra Dabholkar

Web Title: Know all about professor parashram r arde his social work in anis with dr narendra dabholkar pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.