• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. i was in place devendra fadnavis i resign and get election maharashtra say aaditya thackeray ssa

Photos : “देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर राजीनामा दिला असता अन्…”, आदित्य ठाकरेंची रोखठोक भूमिका

शिवसेनेतील फुटीची जबाबदारी ते देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद, आदित्य ठाकरेंची सडेतोड उत्तरे

Updated: November 5, 2022 00:31 IST
Follow Us
  • एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर राज्यात शिंदे यांनी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.
    1/12

    एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर राज्यात शिंदे यांनी भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.

  • 2/12

    मात्र, मी जर आजच्या घडीला उपमुख्यमंत्री असतो, तर सरकारमध्ये राहिलो नसतो.

  • 3/12

    देवेंद्र फडणवीस यांच्या जागी असतो तर मी राजीनामा दिला असता. नव्याने निवडणूक घेतली असती, असे शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ते ‘इंडिया टुडे’च्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते.

  • 4/12

    आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो.

  • 5/12

    गेल्या ४० ते ५० वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं नगरविकास खातं, आम्ही त्यांना देऊ केलं होतं, असे सांगत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला.

  • 6/12

    आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील.

  • 7/12

    सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही.

  • 8/12

    मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही, असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.

  • 9/12

    भाजपा अडीच आणि शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची बोलणी झाली होती. त्याच आधारावर युती करण्यावर सहमती झालेली.

  • 10/12

    मात्र, भाजपाने ते आश्वासन पाळलं नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण, आमचा तत्वांवर विश्वास आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

  • 11/12

    शिवसेनेचा लोकशाहीवर विश्वास आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केली.

  • 12/12

    ‘प्राण जाय पर वचन न जाय’ वर आमचा विश्वास आहे. पण, एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे गेला, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केला. ( फोटो साभार – आदित्य ठाकरे ट्विटर )

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis

Web Title: I was in place devendra fadnavis i resign and get election maharashtra say aaditya thackeray ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.