-
साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात करण्यात आली.
-
या कारवाईसाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात बुधवारी रात्रीपासून दाखल झाले होते.
-
पहाटे ही सर्व यंत्रणा प्रतापगडावर दाखल झाली.
-
सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली.
-
प्रतापगड, महाबळेश्वर,वाई, कराड, सातारा येथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
या परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
-
साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील चौधरी आदी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. माध्यम प्रतिनिधींना परीसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
-
अफजलखानाच्या कबरीशेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं.
-
हे बांधकाम पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.
-
न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.
-
त्याप्रमाणे सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज पहाटेपासून सुरु केली.
-
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीशेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात येत होते.
-
तेथे उरूसही भरविण्यास सुरवात झाली होती. तेथील उदात्तीकरण रोखण्याची मागणी करण्यात आली होती.
-
सध्या या परिसरात जाण्यास सामान्यांना बंदी घालण्यात आली होती.
-
आज पहाटे तारखेप्रमाणे आलेल्या शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
PHOTOS: १८०० पोलीस, कडेकोट सुरक्षा अन् जमावबंदी; शिवप्रतापदिनीच अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
शिंदे सरकारकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई
Web Title: Illegal construction near afzal khan grave demolished pratapgarh in satara sgy