• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. delhi jama masjid administration revoke order to ban entry after governor intervention know whole controversy hd import spb

Photos: मुलींना प्रवेशबंदी, टीकेची झोड अन् U-Turn; दिल्लीतील जामा मशिदीमध्ये एका दिवसात नेमकं घडलं काय?

दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीमध्ये मुलींनी एकट्य़ाने किंवा गटाने प्रवेश करू नये, असा वादग्रस्त निर्णय घेण्याता आला होता.

November 25, 2022 15:07 IST
Follow Us
  • दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीमध्ये मुलींनी एकट्य़ाने किंवा गटाने प्रवेश करू नये, असा सूचना फलक प्रवेशद्वाजवळ लावण्यात आला होता.
    1/11

    दिल्लीतील प्रसिद्ध जामा मशिदीमध्ये मुलींनी एकट्य़ाने किंवा गटाने प्रवेश करू नये, असा सूचना फलक प्रवेशद्वाजवळ लावण्यात आला होता.

  • 2/11

    मशीद प्रशासनाच्या या निर्णयानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. याची दखल महिला आयोगानेही घेतली होती.

  • 3/11

    दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांना विनंती केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

  • 4/11

    नायब राज्यपालांनी यासंदर्भात माझ्याशी चर्चा केली असून त्यांच्या विनंतीनंतर आम्ही हा निर्णय मागे घेतला असल्याचे बुखारी यांनी सांगितले.

  • 5/11

    या निर्णयावरून वाद निर्माण झाल्याने शाही इमाम यांनी हा आदेश नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्या मुलींसाठी नाही, असेही स्पष्ट केले होते.

  • 6/11

    या प्रकरणाची महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली होती. हा निर्णय म्हणजे महिलांच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिली होती.

  • 7/11

    जामा मशिदीमध्ये महिलांना प्रवेशास बंदी हे अत्यंत चुकीचे आहे. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही प्रार्थनेचा अधिकार आहे, मी जामा मशिदीच्या इमामांना नोटीस पाठवत आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या.

  • 8/11

    दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालवीय यांनी ट्वीट करत हा निर्णय लाजीरवाणा आणि असंवैधानिक आहे, असेही म्हटले होते.

  • 9/11

    शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांच्या म्हणण्यानुसार, मशीद परिसरातील काही घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

  • 10/11

    जामा मशिद हे प्रार्थनास्थळ असून यासाठी नागरिकांचे स्वागत आहे. परंतु मुली एकट्य़ा येतात आणि त्यांच्या मित्रांची प्रतीक्षा करतात. ही जागा यासाठी नाही म्हणून बंदी घातली, असेही ते म्हणाले होते.

  • 11/11

    मशीद, मंदिर किंवा गुरुद्वारा ही ठिकाणे प्रार्थनास्थळे आहेत. यासाठी कोणतेही प्रतिबंध नाहीत. आज २०-२५ मुली आल्या होत्या. त्यांना प्रवेश देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

  • 12/11

    या अगोदरही मशिदीमध्ये आलेल्या काही जणांनी चित्रिकरणाचा प्रयत्न केला होता. त्याला प्रतिबंध करण्यात आला होता. अनुचित प्रकार करणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.

  • फोटो सौजन्य – ‘द इंडियन एक्सप्रेस’
TOPICS
दिल्ली जामा मशिदDelhi Jama Masjid

Web Title: Delhi jama masjid administration revoke order to ban entry after governor intervention know whole controversy hd import spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.