-
‘फोर्ब्स इंडिया’ने नुकतीच २०२२ ची भारतातील अब्जाधिशांची यादी जाहीर केली. या यादीत नऊ भारतीय महिलांनी स्थान मिळवलं आहे.
-
जिंदाल समूहाच्या अध्यक्ष सावित्री जिंदाल या टॉप-१० अब्जाधिशांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. (फोटो-ट्विटर)
-
सावित्री जिंदाल भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्या फोर्ब्सच्या ‘टॉप १०’ यादीतील एकमेव महिला अब्जाधीश आणि सक्रिय राजकारणी आहेत. (संग्रहित फोटो)
-
शेअर बाजारातील किंग दिवंगत राकेश झुनझुनवालांच्या पत्नी रेखा यांनीही या यादीत बाजी मारली आहे. ५.९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह त्या यादीत ३० व्या स्थानावर आहेत. (संग्रहित फोटो)
-
‘नायका’च्या संस्थापक आणि सीईओ फाल्गुनी नायर या यादीत ४४ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४.८ अब्ज डॉलर्स आहे. (संग्रहित फोटो)
-
अब्जाधिशांच्या यादीत ‘बायजू’च्या सहसंस्थापक आणि संचालिका दिव्या गोकुलनाथ यांचाही समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती ३.६ अब्ज डॉलर्स आहे. (फोटो-फेसबुक)
-
मल्लिका श्रीनिवासन या ‘ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड’च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्याचबरोबर त्या भारत सरकारने स्थापन केलेल्या सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यांची संपत्ती ३.४ बिलियन डॉलर्स आहे. (फोटो-एएनआय)
-
किरण मजुमदार-शॉ यांनीदेखील या यादीत स्थान पटकावलं आहे. त्या ‘बायोकॉन लिमिटेड’ आणि ‘बायोकॉन बायोलॉजिक्स’ लिमिटेडच्या संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती २.७ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. (फोटो-एक्स्प्रेस)
-
अनू आगा या अब्जाधीश व्यावसायिकासह सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी १९९६ ते २००४ या काळात ‘थरमॅक्स’ या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीचं नेतृत्व समर्थपणे सांभाळलं. त्यांची एकूण संपत्ती २.२३ अब्ज डॉलर्स आहे.
PHOTOS: ‘फोर्ब्स इंडिया’च्या अब्जाधिशांच्या यादीत महिलांचा दबदबा, सावित्री जिंदाल ते फाल्गुनी नायर, ‘या’ महिलांनी पाडली छाप
जिंदाल समूहाच्या अध्यक्ष सावित्री जिंदाल भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत
Web Title: Forbes india released the india rich list for 2022 savitri jindal falguni nayar bagged the the spots rvs