• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm modis mother heeraben modi passes away at 100 msr

PHOTOS : पंतप्रधान मोदींचा रुग्णवाहिकेतून प्रवास, गांधीनगरमधील घराबाहेरची गर्दी अन्…; हिराबेन मोदींना अखेरचा निरोप देतानाची क्षणचित्रे

PM Modi’s Mother Hiraba Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे आईच्या निधनाची दिली माहिती

Updated: December 30, 2022 11:46 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.
    1/24

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.

  • 2/24

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

  • 3/24

    आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी सकाळीच गांधीनगरमध्ये दाखल झाले.

  • 4/24

    पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती.

  • 5/24

    हिराबेन मोदी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी यावर शोक व्यक्त केला.

  • 6/24

    मोदी कुटंबीयांना धीर देण्यासाठी विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या घरी सकाळीच पोहचले होते.

  • 7/24

    पंतप्रधान मोदींनी घरीच आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

  • 8/24

    पार्थिवाला यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं होतं.

  • 9/24

    “एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं,” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे.

  • 10/24

    आईचा दिवा हातात घेतलेला फोटो शेअर करत, “आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तीचा अनूभव घेतला ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,” असं मोदी म्हणाले आहेत.

  • 11/24

    रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला.

  • 12/24

    हिराबेन यांच्या अंत्ययात्रेतही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

  • 13/24

    अंत्ययात्रेप्रसंगी सुरक्षा व्यवस्थाही होती. मोदींच्या सभोवताली अन्य गर्दी होऊ नये याची दक्षताही घेण्यात आल्याचे दिसले.

  • 14/24

    रुग्णवाहिकेमधून पार्थिव स्मशानभूमीमध्ये अंतिमसंस्कारासाठी नेताना मोदींनी रुग्णवाहिकेमधूनच प्रवास केला.

  • 15/24

    मोदींच्या मातोश्रींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती.

  • 16/24

    माध्यमप्रतिनिधींचीही मोठ्याप्रमाणावर गर्दी होती.

  • 17/24

    जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ डिसेंबर रोजी यूएन मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं.

  • 18/24

    रात्री साडेतीनच्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • 19/24

    पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद गेले होते.

  • 20/24

    यू. एन. मेहता रुग्णालयाने हिराबेन मोदी यांच्या मृत्यूची माहिती एका पत्रकाद्वारे जारी केली आहे.

  • 21/24

    ३० डिसेंबर २०२२ रोजी यू. एन. मेहता रुग्णालयामध्ये हिराबेन मोदी यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यांनी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरच्या श्वास घेतला, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.

  • 22/24

    गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारानिमित्त मोदी गुजरातमध्ये होते तेव्हा त्यांनी आईची भेट घेतली होती.

  • 23/24

    हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी झाला. याच वर्षी त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. 

  • 24/24

    …आणि पंतप्रधान मोदींनी आपल्या आईला अखेरचा निरोप दिला.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Pm modis mother heeraben modi passes away at 100 msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.