Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bjp leader chitra wagh attack rupali chakankar over urfi javed controversey ssa

Photos : “…तर महिला आयोगाच्या पदावर बसण्याचा अधिकार नाही”, राष्ट्रवादीच्या आजी-माजी नेत्या ‘उर्फी’वरून भिडल्या!

“ट्वीटरच्या बातमीची दखल घेणारं महिला आयोग…”

January 5, 2023 20:11 IST
Follow Us
  • 'बिग बॉस' उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहे. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता.
    1/9

    ‘बिग बॉस’ उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहे. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता.

  • 2/9

    याला प्रत्युत्तर देताना महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या की, “प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं.”

  • 3/9

    “त्यातूनही कुणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला, तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांनाही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं.”

  • 4/9

    “एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही,” असं रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ

  • 5/9

    यावरून आता चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. “आयोगाचं काम महिलांचा सन्मान जपणं, मान राखणं आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाला जाब विचारु वाटला नाही.”

  • 6/9

    “कारण, त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. मग, वेळ कशासाठी घालवायचा आहे. एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना सुमोटो दाखल करुन कारवाई का केली नाहीत.”

  • 7/9

    “यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही,” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.

  • 8/9

    “उर्फीबरोबर महिला आयोग सुद्धा बेफाम झालं आहे का? वेब सीरीजच्या पोस्टरमुळे धुम्रपानाचं समर्थन आणि अंगप्रदर्शन होत असल्याने कारवाई करण्यात आली.”

  • 9/9

    “मग येथे तर लाईव्ह शो सुरु आहे. ट्वीटरच्या बातमीची दखल घेणारं महिला आयोग मुंबईच्या रस्त्यावरील चाललेल्या नंगानाचची दखल घेऊ शकत नाही का?,” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला होता.

TOPICS
उर्फी जावेदUrfi Javedचित्रा वाघChitra Waghरुपाली चाकणकरRupali Chakankar

Web Title: Bjp leader chitra wagh attack rupali chakankar over urfi javed controversey ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.