-
शेतकरी कष्टकरी अशा गरिबांचा देव असणाऱ्या विठ्ठलाच्या खजिन्यामध्ये जालना येथील एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे दान दिले आहे.
-
वसंत पंचमीच्या पूर्वसंध्येला सोन्याचा मुकुट अर्पण केला. तसेच रुक्मणी मातेला बांगड्या मंगळसूत्र अशी आभूषण देखील अर्पित केली.
-
या दानामध्ये रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी अशी सोन्याची दागिने दान केली आहेत.
-
मागच्या ५० वर्षांतील हे सर्वात मोठे दान असल्याचे पंढरपूर मंदिर समितीचे व्यवस्थापक बालादी पुदवाड यांनी सांगितले.
-
हे सर्व दागिने पुणे येथील नगरकर सराफ यांच्याकडे घडवण्यात आले असल्याची माहिती आहे. अशा अमूल्य दागिन्यांमुळे विठ्ठलाच्या खजिनात मोठी भर पडली आहे.
-
आज वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा साजरा केला जात असतो. यानिमित्त देशभरातून लाभो भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात.
-
देवाच्या रोजच्या पुजाअर्चासाठी लागणारे चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवासाठी चांदीचा आरसा अशा वस्तू या दानामध्ये समाविष्ट आहेत.
-
विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी खास चेन्नई व बंगळुरु येथून रेशमाचे पांढरे वस्त्र आणण्यात आले आहेत.
-
पांढऱ्या रेशमी वस्त्रामध्ये विठुरायचे अतिशय मनमोहक, लोभस असे रुप पाहायला मिळत आहे.
-
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात भारतीय ध्वजाच्या रंगात फुलांची सजावट करण्यात आली आहे. अतिशय सुंदर अशी ही सजावट आहे.
-
विठुरायाच्या गाभाऱ्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त फुलांची आरास करण्यात आली आहे. भारतीय ध्वजाच्या रंगात मंदिराचा गांभारा अतिशय मनमोहक दिसत आहे.
-
रुक्मिणी मातेच्या मुर्तीलाही सजावट करण्यात आली आहे. आजच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विठुरायाचे भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे दाखल झाले आहेत.
Photos: विठुरायाच्या चरणी पावणे दोन कोटींचे गुप्त दान; विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा झाला खास
आज वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा साजरा केला जात असताना एका अज्ञात भक्ताने पावणे दोन कोटींचे दागिने दान केले आहेत.
Web Title: Devotee donated jewellery worth two crore at vitthal rukmini temple in pandharpur kvg