-
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
-
यानंतर फडणवीसांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केला. यात त्यांनी फडतूसपासून लाळघोटेपणापर्यंत प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलं.
-
ते मंगळवारी (४ एप्रिल) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. फडणवीस नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
-
अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे – देवेंद्र फडणवीस
-
माझा प्रश्न असा आहे की, दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत, त्या मंत्र्यांभोवती लाळघोटत असतात अशा मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे – देवेंद्र फडणवीस
-
जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे – देवेंद्र फडणवीस
-
ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे – देवेंद्र फडणवीस
-
अडीच वर्षे घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये – देवेंद्र फडणवीस
-
आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल – देवेंद्र फडणवीस
-
आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही – देवेंद्र फडणवीस
-
ज्या दिवशी बोलणं सुरू करेन त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे त्यांनी संयमाने बोलावं – देवेंद्र फडणवीस
-
त्यांचा थयथयाट आणि निराशेला उत्तर देण्याचं कारण नाही – देवेंद्र फडणवीस
-
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींचा फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटतात – देवेंद्र फडणवीस
-
फक्त खुर्चीसाठी ते लाळघोटेपणा करतात. मग खरा फडतूस कोण? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे – देवेंद्र फडणवीस
-
ते जितक्या भाषेत बोलले, त्यापेक्षा खालच्या पातळीची भाषा मला येते. मी नागपूरचा आहे – देवेंद्र फडणवीस
-
मात्र, मी तसं बोलणार नाही. कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही – देवेंद्र फडणवीस
-
या निमित्ताने मी एवढंच सांगतो की, याचं उत्तर त्यांना जनता देईल – देवेंद्र फडणवीस
-
मी ५ वर्ष गृहमंत्री राहिलो आहे, आता पुन्हा आहे – देवेंद्र फडणवीस
-
मला याची जाणीव आहे की, मी पुन्हा गृहमंत्री झाल्यापासून अनेक लोक देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, की मला गृहमंत्रीपद सोडावे लागेल – देवेंद्र फडणवीस
-
मात्र, मी तुमच्या मेहनतीने नाही, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये गृहमंत्री आहे – देवेंद्र फडणवीस
-
जो-जो चुकीचे काम करेल, मी त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – देवेंद्र फडणवीस
-
राज्यात कुठेही कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल. पण, त्याआड राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य ठरणार नाही – देवेंद्र फडणवीस
-
चाणक्य एकदा असे म्हणाले होते की, राज्यातील चोर, डाकू, लुटेरु किंवा अपप्रवृतीचे लोक राजाविरुद्ध बोलतात, तेव्हा राजा योग्यप्रकारे कारभार करतो आहे – देवेंद्र फडणवीस
-
मी राजा नाही, पण तरीही देखील चाणक्य जे म्हणाले तेच आता खरे होताना दिसते आहे – देवेंद्र फडणवीस
“मी त्या-त्या व्यक्तीला तुरुंगात टाकणार”, देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले? वाचा…
फडणवीसांनीही ठाकरेंवर हल्लाबोल केला. यात त्यांनी फडतूसपासून लाळघोटेपणापर्यंत प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
Web Title: Know statements of devendra fadnavis while answering uddhav thackeray criticism pbs