• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. this leader beats joe biden know who are the highest paid leaders in the world pvp

Photos: जो बायडेन यांना मागे टाकून ‘या’ नेत्याने मारली बाजी; जाणून घ्या, कोण आहेत जगातील सर्वाधिक पगार घेणारे नेते

आज आपण जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या राष्ट्रप्रमुखांबद्दल जाणून घेणार आहोत.

June 10, 2023 11:16 IST
Follow Us
  • Salaries-of-World-Leaders
    1/12

    कोणत्याही देशाचा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रप्रमुख होणे ही अभिमानाची बाब असली, तरीही याबरोबरच खूप ताण आणि दबावही असतो. त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे दडपणही असते.

  • 2/12

    इतक्या जबाबदऱ्या असूनही त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंच्या तुलनेत कमी पगार मिळतो. आज आपण जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या राष्ट्रप्रमुखांबद्दल जाणून घेणार आहोत.

  • 3/12

    जगातील सर्वांत बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षाला सर्वाधिक पगार मिळतोच असे नाही. अमेरिका हे याचे उदाहरण आहे.

  • 4/12

    कोणत्याही देशाच्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना पगारासह अनेक सुविधाही मिळतात. यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. जवळपास हे प्रत्येक देशात घडते.

  • 5/12

    फायनान्शिअल ऑस्ट्रेलियन रिव्ह्यूनुसार, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना वार्षिक ३,११,९६,९९८ रुपये मिळतात. ते जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या राजकारण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत.

  • 6/12

    जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पगाराच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा वार्षिक पगार जवळपास ३,२९,७५,७६० रुपये इतका आहे. याचबरोबर त्यांना त्यांच्या पदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांच्या पगाराव्यतिरिक्त वार्षिक ४१,२१,९७० रुपयेही मिळतात.

  • 7/12

    स्विस कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅलेन बेर्सेट हे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या राजकारण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. स्विस सरकारच्या म्हणण्यानुसार, जानेवारी 2023 पासून, त्यांना पगार म्हणून वार्षिक ४,१६,३१,२९१ रुपये म्हणजेच ५०५,००० डॉलर इतके वेतन मिळते.

  • 8/12

    हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ली का चिऊ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, त्यांना वर्षाला अंदाजे ५,५४,०६,७३६ रुपये म्हणजेच ६७२,००० डॉलर इतके वेतन मिळते.

  • 9/12

    जागतिक लोकसंख्या पुनरावलोकनानुसार, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांना जागतिक स्तरावर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक पगार मिळतो. त्यांना वर्षाला सुमारे १३ कोटी रुपये म्हणजेच १.६ दशलक्ष डॉलर इतका पगार मिळतो.

  • 10/12

    वेज इंडिकेटरनुसार, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कॉल्झ यांना पगार म्हणून दरवर्षी २,९६,७९,३३६ रुपये मिळतात. या यादीत ते सहाव्या क्रमांकावर आहेत.

  • 11/12

    न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स २,८०,३०,४५० रुपये वार्षिक पगारासह स्कोल्झ यांच्या एका क्रमांकाच्या खाली आहेत.

  • 12/12

    (फोटो : Freepik आणि Reuters)

TOPICS
जो बायडेनJoe Bidenमराठी बातम्याMarathi News

Web Title: This leader beats joe biden know who are the highest paid leaders in the world pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.