Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay dutt in matoshree with bag say narayan rane ssa

“‘मातोश्री’वर संजय दत्त कुठल्या गेटने बॅग घेऊन आत आला, हे…”, नारायण राणेंचा मोठा दावा

“एक कामगारामागे ४ लाख रूपये याप्रमाणे…”, असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

September 5, 2023 19:13 IST
Follow Us
  • narayan rane slams uddhav thackeray over konkan development
    1/6

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एअर इंडिया मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख रूपये द्यायचा. तसेच, सहारांकडून उद्धव ठाकरेंनी ७ कोटी रूपये घेतल्याचा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

  • 2/6

    खासदार गजानन कीर्तिकर यांच्या ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले, “माझं तोंड उद्धव ठाकरेंनी उघडायला लावू नये. अन्यथा ‘मातोश्री’चा दरवाजा उघडणार नाही. एअर इंडियाचा मॅनेजर उद्धव ठाकरेंना महिन्याला २५ लाख रूपये द्यायचा.”

  • 3/6

    नारायण राणेंनी म्हटलं, “सुब्रत सहारा यांनी एक हॉटेल विकत घेतलं. तेथील पहिल्या कामगारांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मग, हॉटेलमधील १४० मराठी कामगारांना कामावरून काढायचं कसं हा प्रश्न पडला. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना हॉटेलमध्ये दगडफेक करण्यात सांगितलं. नंतर उद्धव ठाकरेंकडे तडजोड झाली.”

  • 4/6

    “एक कामगारामागे ४ लाख रूपये याप्रमाणे ७ कोटी रुपये उद्धव ठाकरेंनी घेतले. त्यामुळे १४० कामगार बेकार झाले,” असं नारायण राणे यांनी सांगितलं.

  • 5/6

    “एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप करतात. मग, तुम्हाला आम्ही काय बोके दिले का? खोकेच दिले ना. उद्धव ठाकरेंनी नाही म्हणावं, मग मी दिवस सांगतो. आम्ही सुद्धा कुठल्या दिवशी काय दिलं, कोणत्या गेटने आत गेलो, याची डायरी लिहितो,” असा दावाही नारायण राणेंनी केला.

  • 6/6

    “आम्ही ‘मातोश्री’वर असताना संजय दत्त कुठल्या गेटने बॅग घेऊन आत आला होता, हे सुद्धा माहिती आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayनारायण राणेNarayan Raneसंजय दत्तSanjay Dutt

Web Title: Sanjay dutt in matoshree with bag say narayan rane ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.