Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. total 21 ancient ganesha idols in ter village see photos mrj

महाराष्ट्रातल्या ‘या’ गावात आहेत २१ पुरातन गणेश मुर्ती; पाहा फोटो

महाराष्ट्रातील तेर हे कदाचित एकमेव गाव असेल, जेथे २१ पुरातन गणेशमूर्ती अस्तित्वात आहेत.

September 23, 2023 09:10 IST
Follow Us
  • ancient Ganesha idols in Ter village
    1/9

    हिंदू, बौध्द, जैन अशा विविध धर्मांशी हजारो वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या तगर म्हणजेच आजच्या तेर गावचा इतिहास थक्क करणारा आहे. या परिसरात शैव, वैष्णव, शाक्य सांप्रदायाचे केवळ अस्तित्वच नाही, तर त्यांचे इथे प्राबल्यही होते.

  • 2/9

    गणपतीला इश्टदेव मानणारा वर्गही हजारो वर्षांपासून इथे वास्तव्यास होता. त्यामुळेच २१ पुरातन गणेशमूर्ती आजही गतकाळातील समृध्द वारशाचा सप्रमाण पुरावा देत आहे. महाराष्ट्रातील तेर हे कदाचित एकमेव गाव असेल, जेथे २१ पुरातन गणेशमूर्ती अस्तित्वात आहेत.

  • 3/9

    तेर येथे झालेल्या उत्खननात विविध प्रकारच्या दगडांमधून निर्माण करण्यात आलेल्या अनेक गणेशमूर्ती तेरच्या उत्खननातून समोर आल्या आहेत.

  • 4/9

    रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात त्या आजही आपल्याला पहावयास मिळतात. आकाराने लहान परंतु कलाकुसरीच्या दृष्टिने अत्यंत आकर्षक असलेल्या या मूर्तींकडे पाहताना प्राचीन काळातील गणेशपूजकांची दृष्टी स्पष्ट होते.

  • 5/9

    या शासकीय वस्तुसंग्रहालयात मोरावर आरूढ असणारा गजानन हातामध्ये कमळकळी, डमरू व त्याचा आवडता मोदक घेवून बसला आहे.

  • 6/9

    उत्तर यादवकालीन मानल्या जाणार्‍या गणेशमूर्तीच्या मस्तकावरील मुकुट, गळ्यातील हार, पायातील तोडे, कंकण, मेखला आणि अंगावरचे यज्ञोपवितही लक्षवेधी पध्दतीने कोरले आहे.

  • 7/9

    मोदकाना सोंडेने स्पर्श करणारा हा गजवदन शहाबादी दगडापासून कोरण्यात आला आहे.

  • 8/9

    मेंडेश्वराच्या पाठीमागे असलेले शिल्प, तुंगेश्वर मंदिरातील गणपती, कणकेश्वर महादेवाच्या मागील वरदविनायका अप्रतिम गणेशमूर्तीचे दर्शन घेताच भाविकांना मोठे समाधान लाभते.

  • 9/9

    तेरमधील विविध मंदिरात विविध काळातील गणनायकाच्या मूर्ती आजही सुस्थितीत आहेत. (सर्व फोटो- लोकसत्ता टीम)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Total 21 ancient ganesha idols in ter village see photos mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.