-
९ जानेवारी रोजी भल्या पहाटे दिल्लीच्या कुडकुडणाऱ्या बोचऱ्या थंडीत भारतीय नौदल आणि निमलष्करी दलाचे जवान कवायतीमधील सुस्पष्टता आणि समन्वयाची तालीम करताना दिसले.
-
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी कवायत ही कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणेचा स्त्रोत असते.
-
भारताच्या लष्करी सामर्थ्याचे भव्य प्रदर्शन आणि लष्करातील वैविध्यपूर्ण संस्कृती, प्रजासत्ताक दिनाच्या परेड (कवायत) मधून दिसत असते. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या हृदयात या परेडबद्दल एक वेगळाच आदर आहे.
-
१९ व्या शतकात युरोपमध्ये वाढत्या राष्ट्रवादामुळे लष्करी कवायती राष्ट्रीय प्रतीक बनल्या. यामाध्यमातून देशातील रहिवाशांच्या सामूहिक भावना एकवटता येतात, तसेच सामूहिक राष्ट्रभक्ती निर्माण केली जाते.
-
भारताला स्वातंत्र्यप्राप्ती मिळाल्यानंतर अनेक ब्रिटिश परंपरांपैकी लष्करी कवायतीही पुढच्या काळात चालू राहिल्या.
-
१९५० साली भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्करी परेड करण्यात आली होती. तत्कालीन नेत्यांनी हा दिवस भारतातील राज्ये आणि लोकांसाठी विजय दिन असल्याचे म्हटले.
-
पूर्वी इर्विन ॲम्फीथिएटर (आता याचे नाव मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान) मध्ये कवायती होत असत, त्यानंतर त्या राजपथ (आता याचे नाव कर्तव्यपथ) येथे स्थलांतरीत झाल्या. कर्तव्यपथावर आल्यानंतर कवायतींना भव्य स्वरुप प्राप्त झाले.
-
हळूहळू राजपथावर (कर्तव्यपथ) विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्ररथही धावू लागले. ज्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन सर्वांनाच पाहायला मिळते. चित्ररथ आता प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीचा अविभाज्य भाग बनले आहे.
-
विविध राज्यांचे चित्ररथ भारतातील विविधता दाखवून देतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्र अस्मितीचे अनोखे दर्शन भारतीय नागरिकांना होत असते.
-
अनेक भारतीय नागरिकांसाठी प्रजासत्ताक दिनाची लष्करी कवायत ही त्यांच्या प्रादेशिक अस्मितेचे दर्शन घडविणारी असते.
-
यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे ७५ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत.
Photo : ७५ वा प्रजासत्ताक दिन: कर्तव्यपथावर कवायतींची रंगीत तालीम
75th Republic Day in 2024 : यावर्षी २६ जानेवारी रोजी भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर सुरक्षा दलाच्या विविध शाखांकडून कवायतींची रंगीत तालीम सुरू आहे. (All Photo by Indian Express – Chitral Khambhati)
Web Title: A look at republic day parade rehearsals in delhi kvg