• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ram temple inauguration latest photos ahead of pran pratishtha ceremony kvg

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राम मंदिर सज्ज; सजावटीचे मनमोहक फोटो बघितलेत का?

अयोध्यानगरीतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात उद्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी मंदिरात मनमोहक सजावट करण्यात आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिराला केलेल्या सजावटीचे फोटो एक्स अकाऊंटवर टाकले आहेत. (Photo Credit – Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust)

Updated: January 21, 2024 11:00 IST
Follow Us

  • Ayodhyas Ram Temple _ 1
    1/11

    राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघा एक दिवस उरला आहे. संपूर्ण देश या सोहळयाची प्रतिक्षा करत आहे. राम मंदिरात उद्याच्या सोहळ्याची लगबग सुरू आहे.

  • 2/11

    श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंदिराला आकर्षक सजावट केली असून फुलांनी मंदिराला व्यापून टाकले आहे. याचे काही फोटो आता व्हायरल होत आहेत.

  • 3/11

    राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही उपस्थिती असणार आहे.

  • 4/11

    प्राणप्रतिष्ठेचा दिवस आता एका दिवसावर येऊन ठेपला असताना संपूर्ण भारतात एका सणाप्रमाणे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या राम मंदिरात वेद आणि पुराणांमधील विविध परंपरांनुसार प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जाईल.

  • 5/11

    प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्तीवर विविध विधी केले जातात, त्यानंतर मूर्तीला देवत्त्व प्राप्त होतं. सोहळा किती सर्वसमावेशक आहे यावर ही प्रक्रिया किती मोठी असणार हे ठरते.

  • 6/11

    अयोध्येतील राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं गेलं आहे. मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) ३८० फूट, रूंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.

  • 7/11

    राम मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. मुख्य गाभाऱ्यात प्रभु श्रीरामाचं बालरुप मूर्ती असेल. तर, पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल.

  • 8/11

    मंदिरात ५ मंडप असतील. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप असणार आहेत. खांब आणि भिंतींवर कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती असणार आहेत.

  • 9/11

    मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिर म्हणजेच महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषिपत्नी देवी अहिल्या यांची मंदिरेही असणार आहेत.

  • 10/11

    मंदिर संकुलात सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे, जेणेकरून बाह्य संसाधनांवर कमीत कमी अवलंबित्व राहील.

  • 11/11

    मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे. पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे. एकूण ७० एकर क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र कायम हिरवेगार राहील.

TOPICS
अयोध्याAyodhyaपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiराम जन्मभूमीRam Janmabhoomiराम मंदिरRam Mandir

Web Title: Ram temple inauguration latest photos ahead of pran pratishtha ceremony kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.