• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rajkot gaming zone lacked fire department permit had only one exit latest fact in the matter spl

धक्कादायक! राजकोटमधील गेमिंग झोनकडे अग्निशमनचे नाहरकत प्रमाणपत्रच नव्हते; होता तीन हजार लिटर पेट्रोल-डिझेलचा साठा

Rajkot gaming zone fire : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घटनास्थळाला आज भेट दिली आहे.

Updated: May 26, 2024 16:43 IST
Follow Us
  • Rajkot gaming zone fire
    1/10

    गुजरातच्या राजकोटमधील गेमझोनमध्ये लागलेल्या आगीत मृत पावलेल्या निरपराधांचा आकडा वाढतच चालला आहे. काल रात्री गुजरातमधून ही घटना पुढे आली. या दुर्घटनेत एकूण २८ जणांचा बळी गेला आहे आणि यामध्ये ९ चिमुरड्यांचा समावेश आहे. (Photo- PTI)

  • 2/10

    दरम्यान ज्या गेमिंग झोनमध्ये आग लागली तिथे अग्निशमन विभागाकडून दिले जाणारे नाहरकत (एनओसी) प्रमाणपत्रच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबद्दलची माहिती एसआयटी तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Photo- PTI)

  • 3/10

    या भीषण आगीत मृत पावलेल्या नागरिकांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने गोळा केले जात आहेत, त्यांच्या चाचणीतून ओळख पटवली जाईल, अशी माहिती एसआयटी तपास अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय माहितीत असेही समोर आले आहे की, गेमिंग झोनमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी फक्त एकच दरवाजा ठेवण्यात आला होता. याशिवाय आतमधील भागात हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल हे इंधनं साठवून ठेवले होते. या कारणाने आगीचे स्वरूप इतके भीषण झाले आणि झपाट्याने पसरलेल्या आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. (Photo- PTI)

  • 4/10

    गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज आगीच्या ठिकाणी जाऊन मदतकार्याची माहिती घेतली. बचाव कार्याची दखल घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. (Photo- PTI)

  • 5/10

    आत आणि बाहेर जाण्यासाठी केवळ एकच दरवाजा होता तसेच तो दरवाजा सहा ते सात फुट इतक्या उंचीचा होता. शनिवारी ९९ रुपयात प्रती प्रवेश अशी योजना गेमिंग झोनवर सुरु असल्याने इथे मोठी गर्दी जमली होती. टीआरपी गेम्सच्या जनरेटरसाठी जवळपास २००० लिटर डीझेल तर गो कार्ट रेसिंगसाठी १००० ते १५०० लिटर पेट्रोल साठवून ठेवण्यात आलेले होते. (Photo- PTI)

  • 6/10

    या घटनेच्या चौकशीसाठी गुजरात सरकारने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय एसआयटी समितीला ७२ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे पथक शनिवारी उशिरा राजकोटला पोहोचले आणि त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली. एसआयटीचे प्रमुख असलेले अतिरिक्त पोलिस डीजीपी सुभाष त्रिवेदी यांनी ही घटना दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “जबाबदार असलेल्यांचा शोध घेण्यासाठी तत्काळ चौकशी सुरू केली गेली आहे आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल.” (Photo- PTI)

  • 7/10

    राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, “विद्युत कारणांमुळे आग लागली असावी. मात्र, नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. टीआरपी गेम झोनमध्ये प्रथम मोठी आग लागली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बचावकार्य सुरू करण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.” (Photo- PTI)

  • 8/10

    या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यात गेमिंग झोनचे मालक आणि व्यवस्थापक यांचा समावेश आहे. टीआरपी गेम झोनचे व्यवस्थापक नितीन जैन आणि मालक युवराज सिंग सोलंकी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सोलंकीसह सहा जणांविरुद्ध आयपीसी कलम ३०४, ३०८, ३३७, ३३८, ११४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (Photo- PTI)

  • 9/10

    घटनेच्या पार्श्वभूमीवर, गुजरात डीजीपीने राज्यातील सर्व गेमिंग झोनची तपासणी करण्याचे आणि अग्निसुरक्षा परवानगीशिवाय कार्यरत असलेल्यांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ही प्रक्रिया करण्याचे निर्देश डीजीपींनी पोलिसांना दिले आहेत. (Photo- PTI)

  • 10/10

    हे देखील वाचा- PHOTOS : कसा झाला ‘तो’ अपघात ज्यामध्ये इराणी राष्ट्राध्यक्षांचं निधन झालं; घटनेनंतर क

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Rajkot gaming zone lacked fire department permit had only one exit latest fact in the matter spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.