-
रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांवर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. (प्रतीकात्मक फोटो)
-
रेमल चक्रीवादळ हळू हळू किनारपट्टीवर दाखल झाले आहे. या चक्रीवादळात वाऱ्याचा वेग १३५ किलोमीटर प्रति तास असेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने याआधीच वर्तवली आहे. (प्रतीकात्मक फोटो)
-
हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये हाय अलर्ट दिला आहे. तसेच आता कोलकाता शहरा सारख्या अनेक शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवातही झाली आहे. (प्रतीकात्मक फोटो)
-
पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनाऱ्यावर तसेच उत्तर बंगालच्या उपसागरात वादळी वाऱ्याचा वेग ताशी ११० ते १२० किमी होता. त्यानंतर हे वारे ताशी १३५ किमी वेगाने वाहत होते. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. (प्रतीकात्मक फोटो)
-
पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही आनंद बोस यांनीही नागरिकांना सावधगिरी बाळगावी असे सांगितले आहे. (प्रतीकात्मक फोटो)
-
त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. तसेच केंद्रीय गृह विभागाला परिस्थितीवर देखरेख ठेवायला सांगितले. (Photo-ANI)
-
पश्मिच बंगाल सरकारने किनारपट्टी भागाप्रमाणेच सागर बेट आणि सुंदरबन येथून एक लाखाहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. (Photo-ANI)
-
राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या प्रत्येकी १६ तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Photo-ANI)
-
त्याशिवाय ५.४० लाख ताडपत्रींचे वाटप केले आहे, तसेच रेशन, पावडर दूध आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली आहे. (Photo-ANI) हेही पहा – Cyclone Remal: वादळं किती प्रकारची असतात; कशी ठरवतात श्रेणी? ‘रेमल’ चक्रीवादळाच्या नि…
Cyclone Remal: ‘या’ राज्यांच्या किनारपट्टीवर रेमल चक्रीवादळ दाखल; पंतप्रधान मोदींकडून आढावा
पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टी भागात रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री दाखल झाले. या वादळाची तीव्रता ताशी ११० ते १२० किलोमीटर इतकी होती, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
Web Title: Cyclone remal hits west bengal bangladesh coast pm narendra modi reviewed preparation spl