• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. 49 people mostly indians killed in kuwait apartment blaze 9387935 spl

PHOTOS : दुर्दैवी! कुवेतमध्ये इमारतीला लागली भीषण आग; अनेक भारतीयांसह ४९ जणांचा मृत्यू

कुवेतमध्ये बांधकाम कामगार राहत असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ४२ भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे.

June 13, 2024 10:49 IST
Follow Us
  • Kuwait fire
    1/7

    दक्षिण कुवेतमधील मंगफ शहरात बुधवारी (१२ जून) पहाटे एका इमारतीला आग लागली, यात अनेक भारतीयांसह किमान ४९ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. इमारतीमध्ये जवळपास १६० लोक राहत होते, ते सर्व बांधकाम कामगार आहेत. बांधकाम कंपनी एबीटीसी समूहाने ही इमारत आपल्या मजुरांच्या निवाऱ्यासाठी भाड्याने घेतली होती. (PTI)

  • 2/7

    ज्या इमारतीत आग लागली ती बांधकाम कामगारांसाठी वापरली जात होती आणि तिथे मोठ्या प्रमाणात कामगार होते. लागलेल्या भीषण आगीमुळे आणि धुराच्या कचाट्यात सापडल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. (Reuters)

  • 3/7

    कुवेतच्या उप-पंतप्रधानांनी रिअल इस्टेट मालकांवर सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि लालसेचा आरोप केला, अशा पद्धतीने सुरक्षेकडे दुर्लक्ष केले गेले असल्यामुळे ही घटना घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (Reuters)

  • 4/7

    प्रशासनाने सांगितले की, दुर्घटना का झाली याचे कारण शोधले जात आहे, तसेच म्र्त्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांची ओळख पटवण्याचे काम सद्ध्या कर्मचारी करत आहेत. (X/@indembkwt)

  • 5/7

    मृतांमध्ये बहुसंख्य केरळ, तामिळनाडू आणि उत्तर भारतीय राज्यांतील भारतीय नागरिक होते. त्यांचे वय २० ते ५० वर्षांच्या दरम्यान आहे. (X/@indembkwt)

  • 6/7

    भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी अल-अदान रुग्णालयालाही भेट दिली, जिथे आगीच्या घटनेत जखमी झालेल्या ३० हून अधिक भारतीय कामगारांना दाखल करण्यात आले आहे. (X/@indembkwt)

  • 7/7

    स्थानिक प्रसारमाध्यमांनी आणि घटनेच्या साक्षीदारांनी सांगितले की इमारतीचा खालील भाग जिथून बाहेर पडता आले असते तो बंद होता त्यामुळे एकही पिडीत व्यक्तीला आग लागल्यानंतर बाहेर पडता आले नाही त्यामुळे त्यांचा या भीषण आगीत गुदमरून मृत्यू झाला. (Reuters) हेही पहा- Countries without Indians : जगातील ‘या’ देशांमध्ये एकही भारतीय राहत नाही; एक तर शेजारीच आहे!

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: 49 people mostly indians killed in kuwait apartment blaze 87 5 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.