-
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला प्रारंभ झाला आहे.
-
९ जून रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर ७१ मंत्र्यांचेही शपथविधी पार पडले.
-
दरम्यान त्यानंतर त्यांचं खातेवाटपही पूर्ण झाले आहे. मोदी सरकारमधील सर्व मंत्रिमंडळातील सर्वाधिक संपत्ती कोणाकडे आहे हे आपण जाणून घेऊयात.
-
चंद्रशेखर पेम्मासानी, आंध्र प्रदेशातील तेलगू देशम पार्टीचे खासदार असलेले पेम्मासानी आता मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामीण विकास आणि दळणवळण राज्यमंत्री पदावर विराजमान झाले आहे. त्यांच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार त्याच्याकडे तब्बल ५ हजार ७०५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
-
सर्वाधिक मालमत्तेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया. त्यांच्याकडे ४२४ कोटी रुपये इतकी मालमत्ता असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.
-
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमार स्वामी यांना मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रीपद मिळाले आहे, कुमारस्वामी हे २१७ कोटी रुपयांचे धनी आहेत.
-
भाजपा नते तथा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार १४४ कोटी रुपयांच्या संपत्तीचे ते मालक आहेत.
-
सांख्यिकी नियोजन आणि संस्कृती विभागाचे राज्यमंत्री असलेले भाजपा नेते राव इंद्रजीत सिंह यांच्याकडे १२२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
-
भाजपचे ज्येष्ठ नेते वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे ११० कोटी रुपयांची मालमत्ता आहे अशी माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात दिली आहे.
PHOTOS : ‘हे’ आहेत मोदी सरकारमधील कोट्याधीश मंत्री; एकाची संपत्ती तर ५ हजार कोटी आहे!
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक संपत्ती कोणाकडे आहे? हे आपण जाणून घेऊयात. (All Photo Credit – Narendra Modi /Youtube Channel)
Web Title: Richest ministers in modi government 3 0 latest news about the reach ministers in country latest political news spl