Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shinde criticizes uddhav thackeray at shiv sena anniversary day in worli spl

PHOTOS: शिवसेना वर्धापनदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य; लोकसभा निवडणूक निकालावरही भाष्य!

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत घटना बदलणार, आरक्षण रद्द करणार या विरोधकांच्या खोट्या कथानकावर विश्वास ठेवून जनतेने मतदान केले. पण…

Updated: June 20, 2024 17:15 IST
Follow Us
  • eknath shinde at shivsena melava in worl mumbai latest speech
    1/10

    शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत पार पडले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा वरळीमधील झाला.

  • 2/10

    या सभेतील भाषणात लोकसभा निवडणुकीत घटना बदलणार, आरक्षण रद्द करणार या विरोधकांच्या खोट्या कथानकावर विश्वास ठेवून जनतेने मतदान केले. पण आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता ती चूक करणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

  • 3/10

    मराठा, आोबीसी, दलित, आदिवासी महायुतीच्या पाठीशा उभे राहतील आणि महायुतीचा भगवा झेंजा पुन्हा विधान भवनावर फडकेल, असा दावा त्यांनी केला.

  • 4/10

    लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मुस्लिम मतांच्या जोरावर ९ जागा जिंकल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.

  • 5/10

    लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा आपल्या शिवसेनेला राज्यात दोन लाख जादा मते पडली आहेत. समोरासमोर तेरा मतदारसंघात झालेल्या लढतीत आम्ही ७ जागा जिंकून ठाकरे सेनेवर मात दिली आहे. कोकण, ठाणे, संभाजीनगर असे पारंपारिक बालेकिल्लेही आम्हीच सर केल्याने खरी शिवसेना ही कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलावे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला.

  • 6/10

    ठाणे, कोकण, संभाजीनगर हे बालेकिल्ले आपण अबाधित ठेवले. ठाणे, कल्याण लोकसभा तर दोन दोन लाखांच्या फरकाने जिंकली. कोकणात एकही जागा ठाकरे गटाला मिळाली नाही. या निकालांनी दोन वर्षापूर्वी आपण केलेला उठाव हा योग्य होता यावर जनतेनेच शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे खरी शिवसेना आपलीच आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचा टोला शिंदेंनी लगावला.

  • 7/10

    शिंदे पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार कसे जिंकले ते महाराष्ट्राला माहीत आहे. पण ही तात्पुरती आलेली सूज आहे. एकनाथ शिंदे संपणार , शिवसेना संपणार म्हणणाऱ्यांचे दात घशात घातले.

  • 8/10

    एकनाथ शिंदे शिवसैनिक आणि जनतेच्या साथीने जिंकला. हा शिंदे संपणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि दिघेंचा चेला. जनतेचा माझ्यावर प्रेम आहे. देशात जे धाडस कोणी केले नाही ते मी करून दाखविले. भीती माझ्या रक्तात नाही. राजकीय पंडित एक दोन जागा येतील सांगत होते. ठाणे जाईल सांगत होते. पण जनतेेने आम्हालाच कौल दिला, असेही शिंदे म्हणाले.

  • 9/10

    (सर्व फोटो- Express photo by Sankhadeep Banerjee. 19.06.2024.)

  • 10/10

    हेही पहा- PHOTOS: शिवसेना वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा मोदींसह एकनाथ शिंदे, राज ठाकरेंवर हल्लाबोल! वाचा भाषणातील मुद्दे

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shinde criticizes uddhav thackeray at shiv sena anniversary day in worli spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.