-
यूजीसी नेट परीक्षा रद्द केल्याच्या मुद्द्यावरून टीकेला सामोरे जावे लागत असलेल्या, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी २० जून रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, यंदाच्या यूजीसी नेट परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या संदर्भात आम्ही बिहार पोलिसांशी नियमित संपर्कात आहोत. (PTI)
-
तसेच यासंदर्भातील सत्य बाहेर आणण्यासाठी प्रधान यांनी एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी ही समिती सरकारला शिफारस करेल. (PTI)
-
शिक्षण मंत्री प्रधान यांनी डार्कनेटवर पेपर फुटल्याचे मान्य केले. टेलिग्रामवरून पेपर व्हायरल झाल्याचेही त्यांनी सांगितले. याच कारणास्तव मंगळवारी (१८ जून) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली. (PTI)
-
दरम्यान, सीबीआयने यूजीसी नेट परीक्षेच्या प्रामाणिकता आणि विश्वासाहर्तेवर या घटनेतून प्रश्न उपस्थित करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (PTI)
-
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेतील अनियमिततेवरून सुरू असलेला गदारोळ ताजा असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेतही (नेट) अनियमतता आढळून आली आहे. परिक्षांमध्ये गडबड होत असल्याकारणाने देशभरातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. परंतु परिक्षा रद्द झाल्यांनतर आज सरकारविरुद्ध विद्यार्थ्यामध्ये रोष आढळून आला आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
मंत्रालयाच्या या निर्णयामुळे यूजीसी-नेट परिक्षा आयोजित करणाऱ्या एनटीएमधील अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. (Express Photo by Amit Mehra)
-
नीट परिक्षा २०२४ मधील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी निषेध रॅलीत भाग घेऊन देशभरात अनेक निदर्शने केली. (Express Photo by Amit Mehra)
-
यूजीसी-नेट परिक्षा रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि नीट परिक्षेतील अनियमिततेच्या निषेधार्थ दिल्लीत विविध विद्यापीठांमध्ये केल्या गेलेल्या निषेध आंदोलनांतील जवळपास २५ विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. (Express Photo by Amit Mehra) हेही पहा- PHOTOS : देशभरात योग दिनाचा उत्साह; पंतप्रधान मोदींसह ‘या’ राजकीय नेत्यांनी केली योगा…
UGC-NET, NEET Controversy : देशभरातील विद्यार्थी उतरले रस्त्यावर; शिक्षण विभागाविरुद्ध निदर्शने
यूजीसी-नेट २०२४ ची परिक्षा रद्द करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाविरुद्ध निदर्शने केली आहेत.
Web Title: Ugc net neet row student protests streets across country 9404737 spl