-
भर्तृहरी महताब सध्या चर्चेत आहेत. भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची १८ व्या लोकसभेसाठी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. कटकट मतदारसंघातून भाजपचे खासदार असलेले भर्तृहरी महताब हे आधी बीजेडीमध्ये होते पण लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. (@Bhartruhari Mahtab/FB)
-
भर्तृहरी महताब यांनी १९९८ पासून सलग ६ वेळा बीजेडीच्या तिकिटावर कटक मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. २०२४ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर या जागेवरून निवडणूक जिंकली.
-
myneta.info वेबसाइटनुसार लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष भर्तृहरी महताब यांच्या निव्वळ संपत्तीबद्दल सांगायचे झाल्यास, ते १९ कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्याचवेळी त्यांच्या घरात सुमारे ४ कोटी ८१ लाख रुपयांचे दागिने आहेत.
-
१ कोटी ७९ लाख ५७ हजार ८० रुपये त्यांच्या आणि पत्नीच्या नावे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा आहेत.
-
भर्तृहरी महताब यांच्याकडे ७३ लाख रुपयांच्या कार आहेत ज्यात दोन मर्सिडीज बेंझ, एक ह्युंदाई वेर्ना आणि टाटा सफारी कार आहे.
-
भर्तृहरी महताब यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी रेवेनशॉ कॉलेज कटक, उत्कल विद्यापीठ येथून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
-
भर्तृहरी महताब यांच्याकडे ११ कोटी ७३ लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असून त्यामध्ये शेतजमीन, बिगरशेत जमीन, व्यावसायिक इमारती आणि निवासी घरांचा समावेश आहे.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम ९५ (१) अन्वये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून ते ३ जुलै या कालावधीत होणार आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीपर्यंत ते पीठासीन अधिकारी म्हणून कर्तव्ये पार पाडतील.
-
काँग्रेसने भर्तृहरी महताब यांना हंगामी अध्यक्ष करण्यावर आक्षेप घेतला केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी याला विरोध करताना म्हटले आहे की, परंपरेनुसार, नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांसाठी ज्या खासदाराचा कार्यकाळ सर्वात जास्त आहे, त्याला हंगामी अध्यक्ष बनवले जाते.
-
१८ व्या लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ खासदार भाजपचे वीरेंद्र कुमार आणि काँग्रेसचे केके सुरेश आहेत. दोन्ही नेते त्यांचा आठवा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. हेही पहा- PHOTOS : जय श्रीराम ते अल्लाह हू अकबर, संसदेत जेव्हा खासदारांच्या शपथेतील धार्मिक घोष…
PHOTOS : बीजेडीतून भाजपात आता थेट लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी; कोण आहेत भर्तृहरी महताब; किती आहे संपत्ती?
Who is Bhartruhari Mahtab, Net worth and Education : कटकचे भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची १८ व्या लोकसभेसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भर्तृहरी हे उच्च शिक्षित असून करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.
Web Title: Bhartruhari mahtab protem speaker for 18th lok sabha net worth education property education and car collection spl