Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. asaduddin owaisi had given these controversial statement even before jai palestine had once said i will not say bharat mata ki jai spl

PHOTOS : “मी भारत माता की जय म्हणणार नाही!”, जय पॅलेस्टाईनपूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी केलीयत ‘ही’ वादग्रस्त वक्तव्यं!

Asaduddin Owaisi Jai Palestine in parliament, Asaduddin all controversial statement: : हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेच्या शपथविधीवेळी 'जय पॅलेस्टाईन'चा नारा दिला, त्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. परंतु याआधीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.

Updated: June 26, 2024 12:58 IST
Follow Us
  • Asaduddin Owaisi Jai Palestine
    1/8

    हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी १८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार म्हणून शपथ घेताना ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला, त्यानंतर आता वादाला तोंड फुटले आहे. (Indian Express)

  • 2/8

    शपथ घेताना असदुद्दीन ओवेसी यांनी सर्वप्रथम बिस्मिल्लाचे पठण केले. यानंतर उर्दूमध्ये शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर निघताना त्यांनी जय भीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या. यानंतर त्यांनी ‘अल्लाह हू अकबर’चा नाराही दिला. ‘जय पॅलेस्टाईन’ म्हणणाऱ्या ओवेसी यांनी ‘भारत माता की जय’ म्हणायला मात्र आक्षेप घेतलेला आहे.

  • 3/8

    असदुद्दीन ओवेसी याआधीही त्यांच्या अनेक विधानांमुळे वादात सापडले आहेत. कधी त्यांनी भारत माता की जय म्हणण्यास नकार दिला तर कधी भाजप-आरएसएसबाबत वादग्रस्त विधाने केली. चला जाणून घेऊया याबद्दल.

  • 4/8

    काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, नव्या पिढीला ‘भारत माता की जय’ घोषणाबाजी करण्याचा धडा शिकवला पाहिजे. त्यावर टीका करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, “कोणी गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही”.

  • 5/8

    काही वर्षांपूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांना धमकीही दिली होती. “योगी आणि मोदी कायमचेच मुख्यमंत्री, पंतप्रधान पदावर असणार नाहीत हे पोलीसांनी लक्षात ठेवावे आणि आम्ही मुस्लिम या जुलमीपणामुळे नक्कीच गप्प बसलो आहोत, पण तुमचे अत्याचार आम्ही विसरणार नाही, तुमचे अत्याचार आम्ही लक्षात ठेवू.” असे ते म्हणाले.

  • 6/8

    काही काळापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ताजमहाल स्वच्छ करण्यासाठी आले होते, तेव्हा ओवेसी यांनी भाजप-आरएसएसच्या नेत्यांची मने साफ करणे अधिक महत्त्वाचे असल्याची टीका केली होती.

  • 7/8

    ओवेसी यांनी एकदा असेही म्हटले आहे,” इस्लाम सर्व लोकांच मूळ घर आहे, जर इतर धर्माच्या लोकांनी इस्लामचा स्वीकार केला तर ते त्यांच्यासाठी घरवापसीसारखे असेल. प्रत्येक मूल मुस्लिम जन्माला येते.”

  • 8/8

    असदुद्दीन ओवेसीच नाही तर त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांनीही हिंदूंविरोधी वक्तव्ये केली आहेत. २०१३ मध्ये त्यांच्या एका भाषणात अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, “आम्ही २५ कोटी आहोत तुम्ही १०० कोट आहात, १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग कोणामध्ये किती दम आहे हे कळेल.” (हेही वाचा- PHOTOS : ‘जय संविधान’ ते ‘जय भीम’, राहुल गांधी आणि इतर खासदारांच्या संसदेत शपथविधी दर…)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Asaduddin owaisi had given these controversial statement even before jai palestine had once said i will not say bharat mata ki jai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.