• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm modis interaction with the winning indian cricket team spl

PHOTOS : विजेत्या भारतीय संघाशी पंतप्रधान मोदींचा संवाद; प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं कौतुक तर विराट आणि रोहित बद्दल म्हणाले…

जगज्जेतेपदानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाशी फोनवरून संवाद साधला. जाणून घेऊया मोदी काय म्हणाले?

Updated: July 1, 2024 12:05 IST
Follow Us
  • Virat Rohit Retires From T20I
    1/10

    अतिशय रोमांचकारी मुकाबल्यात भारताच्या संघाने उत्कृष्ठ खेळ करत विश्वकप करंडक खेचून आणला.

  • 2/10

    जगभरातून भारतावर अभिनंदंचा वर्षाव सुरु झाला. तब्बल १३ वर्षानंतर ही विश्वकप करंडक जेतेपदाची ट्रॉफी भारताला मिळाली.

  • 3/10

    विविध स्तरांतून भारतीय संघाचे कौतुक सुरु असतानाच विराट कोहली, रोहित शर्मा या फलंदाजांनी T20 फॉरमटमधून निवृत्तीही घोषित केली. त्यांच्यासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही निवृत्ती जाहीर केली.

  • 4/10

    दरम्यान, भारताच्या विजयानंतर देशात जल्लोषाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या विजयात सामील झाल्याचे पाहायला मिळाले.

  • 5/10

    मोदींनी फोनवरुन भारतीय संघाच्या दिग्गजांशी संवाद करत, त्यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. (Narendra Modi/X)

  • 6/10

    विराटशी संवाद
    भारताचा प्रसिद्ध फलंदाज असलेल्या विराट कोहलीशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, “तुझ्याशी बोलून आनंद झाला. फायनलमधील डावांप्रमाणेच तुझी भारतीय फलंदाजी शानदारपणे आहे. तू खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये चमकला आहेस. T20 क्रिकेटमध्ये तुझी कायम आठवण येईल. पण मला विश्वास आहे की तू नवीन पिढीच्या खेळाडूंना प्रेरित करत राहशील.” (Narendra Modi/X)

  • 7/10

    प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी संवाद
    “राहुल द्रविड यांच्या अतुलनीय कोचिंगमुळे भारतीय क्रिकेट टीम यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. राहुल द्रविड यांचं अतूट समर्पण, धोरणात्मक अंतदृष्टी, योग्य प्रतिभा यामुळे संघाचा कायापालट झाला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल आणि पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्यासाठी भारत त्यांचा आभारी आहे. त्याला विश्वचषक जिंकताना पाहून आम्हाला आनंद होत आहे”, असं म्हणत मोदींनी राहुल द्रविड यांचे आभार मानले.

  • 8/10

    कर्णधार रोहित शर्माशी संवाद
    “तुझं व्यक्तिमत्व उत्कृष्ट आहे. तुझी आक्रमक खेळी, फलंदाजी आणि कर्णधारपद यामुळे भारतीय संघाला नवी ओळख मिळाली आहे. तुझी T20ची कारकीर्द कायम लक्षात राहील. आज तुझ्याशी बोलून आनंद झाला”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहित शर्माशी संवाद साधताना म्हणाले आहेत. याबद्दल त्यांनी त्यांच्या ट्वीटरवरूनही पोस्ट शेअर केली आहे.

  • 9/10

    याशिवाय, पंतप्रधानांनी संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाशी संवाद साधला आणि T20 विश्वचषकातील त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. “तुम्ही संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य आणि उत्साह दाखवला. प्रत्येक खेळाडूची बांधिलकी खूप प्रेरणादायी आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Narendra Modi/X)

  • 10/10

    भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. या विजयाबरोबरच भारताने १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवला आहे. हेही पहा- PHOTOS : सूर्यकुमार यादवची पत्नी आहे खूपच सुंदर; “तुझा नवरा २४ कॅरेट सोनं!” असं म्हणत चाहत्यांनी केलं अभिनंदन!

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Pm modis interaction with the winning indian cricket team spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.