• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. akhilesh yadav birthday education qualification love marriage and journey till becoming cm spl

PHOTOS : परदेशातील शिक्षण, डिंपल यांच्याशी प्रेमविवाह ते मुख्यमंत्रीपद; अखिलेश यादव यांचा प्रवास कसा होता?

अखिलेश यादव उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

July 1, 2024 15:55 IST
Follow Us
  • Akhilesh Yadav
    1/10

    समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 2/10

    अखिलेश यादव यांचा जन्म १९७३ मध्ये १ जुलै यादिवशी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सैफई या छोट्याशा गावात झाला. सैफई येथील सेंट मेरी स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले.

  • 3/10

    यानंतर त्यांना राजस्थानमधील धौलपूर येथील मिलिटरी स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांनी कर्नाटकातील म्हैसूर विद्यापीठातून नागरी पर्यावरण विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली.

  • 4/10

    यानंतर अखिलेश यादव उच्च शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले. येथे त्यांनी सिडनी विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

  • 5/10

    अखिलेश यादव जेव्हा इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांची डिंपलशी भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

  • 6/10

    अखिलेश ऑस्ट्रेलियाला शिकण्यासाठी गेले पण त्यांचे डिंपल यांच्याशी असलेले प्रेम वाढत राहिले. जेव्हा भारतात परतले तेव्हा त्यांनी त्यांचा आजीला डिंपलशी लग्न करण्याबाबत सांगून राजीही केले.

  • 7/10

    मात्र वडील आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागली. जेव्हा त्यांच्या वडिलांनी होकार दिला तेव्हा अखिलेश आणि डिंपल यांनी २४ नोव्हेंबर १९९९ रोजी लग्न केले. दोघांना २ मुली आणि एक मुलगा आहे.

  • 8/10

    त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचे तर, अखिलेश २००० मध्ये कन्नौज लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर त्यांनी सलग दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. पण २०१२ मध्ये त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकून मुख्यमंत्री बनले.

  • 9/10

    १५ मार्च २०१२ रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. २०१७ मध्ये ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष बनले. पण या वर्षी झालेल्या यूपी विधानसभा निवडणुकीत अखिलेश काँग्रेसशी हातमिळवणी करून आघाडी सरकार बनवण्यात अपयशी ठरले आणि भाजपा सत्तेवर आली.

  • 10/10

    त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा एकदा अखिलेश यांनी आझमगडमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. २०२२ मध्ये त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर अखिलेश यादव यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्यांदा लढवली आणि जिंकून खासदार बनले.
    (सर्व फोटो : अखिलेश यादव/फेसबुक)
    (हे देखील वाचा: Britain Election 2024 : निवडणुकीच्या वातावरणात ऋषी सुनक लंडनमधील स्वामीनारायण मंदिरात…)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Akhilesh yadav birthday education qualification love marriage and journey till becoming cm spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.