• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is bhole baba all his information name profession hathras case details spl

PHOTOS : भोले बाबा यांच पूर्वाश्रमीचं नाव काय? सत्संगाआधी करायचे ‘हे’ काम! वाचा संपूर्ण माहिती

Who Is Bhole Baba : हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या प्रवचन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेमुळे भोले बाबा नामक व्यक्ती चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

July 3, 2024 10:53 IST
Follow Us
  • UP Hathras Stampede News in Marathi
    1/10

    उत्तर प्रदेशच्या हाथरस याठिकाणी एक भयंकर दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या प्रवचन कार्यक्रमात चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली आहे. भोले बाबांच्या सत्संगाच्या या भव्य कार्यकमात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेने अनेक भक्तांचे बळी घेतले आहेत. (Photo-PTI)

  • 2/10

    नेमकं काय घडलं?
    हाथरस जिल्ह्यातील सिकंदराबाद येथे भोले बाबा यांच्या सत्संगासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहिले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा कार्यक्रम संपला. त्यानंतर भोले बाबा कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीच्या दिशेनं लोक निघाले. या धावपळीत काही लोक खाली पडले आणि ढकलाढकलीला सुरुवात झाली. (Photo-PTI)

  • 3/10

    या गर्दीत मोठ्या संख्येनं लहान मुलं आणि महिलांचाही समावेश होता. ढकलाढकलीचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं आणि एकच गडबड उडाली. या दुर्घटनेत तब्बल ११६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. (Photo-PTI)

  • 4/10

    दरम्यान या दुर्घटनेमुळे भोले बाबा नामक व्यक्ती चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. (Photo-PTI)

  • 5/10

    कोण आहेत भोले बाबा?
    ५८ वर्षीय भोले बाबा उर्फ नारायण साकार विश्व हरी यांचं खरं नाव सुरज पाल सिंह असं आहे. जवळपास ४० वर्षांपूर्वी ते उत्तर प्रदेश पोलिसांत हवालदार म्हणून रुजू झाले होते. १० वर्षं पोलिसांत नोकरी केल्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली. (Photo-X)

  • 6/10

    ९० च्या दशकात त्यांनी हाथरसमधील त्यांच्या मालकीच्या जमिनीवर मोठा आश्रम बांधला आणि तिथे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यास सुरुवात केली. आसपासच्या गावांप्रमाणेच इतर राज्यांमधूनही त्यांच्या आश्रमात मोठ्या संख्येनं लोक येऊ लागले. (Photo-PTI)

  • 7/10

    “पोलिसात १० वर्षं नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. त्यांचं शेवटचं पोस्टिंग आग्रा येथे होत”, अशी माहिती त्यांचा माग काढण्यासाठी त्यांच्या गावी गेलेल्या पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. (Photo-X)

  • 8/10

    भोले बाबा हे विवाहित असून त्यांना मूलबाळ नाही. त्यांनी पोलिसाची नोकरी सोडल्यानंतर ‘भोले बाबा’ हे नाव धारण केलं. त्यांच्या पत्नी ‘माताश्री’ या नावाने ओळखल्या जातात. त्यांचं मूळ गाव असलेल्या बहादूर नगरच्या सरपंच झफर अली यांनी ही माहिती दिली आहे. “ते सुखवस्तू कुटुंबात वाढले. तीन भावंडांपैकी ते दुसरे आहेत. त्यांच्या मोठ्या बंधूंचं काही वर्षांपूर्वी निधन झालं असून धाकटे बंधू आजूनही मूळ गावी कुटुंबासोबत शेती व्यवसाय करतात”, अशी माहिती अली यांनी दिली. (Photo-X)

  • 9/10

    दरम्यान, भोले बाबा यांनी पाच वर्षांपूर्वी त्यांच्या मूळ गावातून पलायन केल्याचा दावा अली यांनी केला आहे. “सुरज पाल सिंगनं पाच वर्षांपूर्वी गाव सोडलं. त्यांच्याविरोधात गावात काही कट-कारस्थान शिजतंय या संशयातून त्यांनी गाव सोडलं. आम्ही असं ऐकलंय की आता ते राजस्थानमध्ये राहतात. गेल्या वर्षी ते पुन्हा गावात आले होते. त्यांनी त्यांची मालमत्ता एका ट्रस्टच्या नावे केली. एक व्यवस्थापक त्यांच्या आश्रमाचं कामकाज पाहतो”, अशी माहितीही अली यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितली. (Photo-X)

  • 10/10

    (Photo-PTI) हेही पाहा- PHOTOS : ‘या’ देशातील महिला क्रिकेटपटू चिंतेत; आयसीसीसमोर हात जोडून मागितली मदत! वाचा…

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Who is bhole baba all his information name profession hathras case details spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.