-
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री खूप लोकप्रिय आहेत. ते फक्त भारतातच नाही तर अनके देशांमध्ये फिरतात व कथा वाचन करतात.
-
नुकतेच ते काही दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला प्रवचनासाठी गेले होते. जिथे त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी अनेक लोक आले होते. जगभरात प्रवचन करणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री किती शिकलेले आहेत ते जाणून घेऊया.
-
पंडित धीरेंद्र शास्त्री हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन धार्मिक स्थळ बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख आणि पुजारी आहेत.
-
धीरेंद्र शास्त्री हे हनुमानाचे भक्त आहेत.
-
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर त्यांनी गंज गावातून सुरुवातीचे शिक्षण घेतले. याच गावातून त्यांनी हायस्कूल आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
-
यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. मात्र, धिरेंद्र शास्त्री हे केवळ आठवी पास असल्याचा दावाही अनेकजण करतात.
-
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-
धीरेंद्र शास्त्री हे प्रसिद्ध कथाकार आहेत आणि त्यांच्या कथा ऐकायला व प्रवचनाला लाखो लोक येतात. धीरेंद्र शास्त्रींच्या आधी त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग बागेश्वर धाममध्ये कथा वाचन करायचे.
-
(सर्व फोटो- बागेश्वर धाम सरकार एक्स अकाउंट)
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री किती शिकलेले आहेत? जाणून घ्या
बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे जगभर प्रसिद्ध आहेत. चला जाणून घेऊया धीरेंद्र शास्त्री किती शिकलेले आहेत?
Web Title: Bageshwar dham sarkar dhirendra krishna shastri education details jshd import hrc